नियमांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2020 10:35 PM2020-08-17T22:35:06+5:302020-08-18T01:11:40+5:30
कळवण : गणेशोत्सव परंपरेप्रमाणे श्रद्धापूर्वक साजरा करत असताना यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गणेश मंडळांनी शासनाने सूचित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नियम पाळत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कळवण : गणेशोत्सव परंपरेप्रमाणे श्रद्धापूर्वक साजरा करत असताना यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गणेश मंडळांनी शासनाने सूचित केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून नियम पाळत गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले.
शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करूनच गणेशोत्सव पार्श्वभूमीवर कळवण पोलीस स्टेशनमध्ये गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली.
सध्या सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना गणेश मंडळांनी आपली सामाजिक जबाबदारी ओळखून शासनाने सांगितलेल्या नियमांनुसार गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.
गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात शासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना व नियमांची माहिती वाघ यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना दिली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक पाराजी वाघमोडे, पोलीस शिपाई गोकुळ खैरनार, योगेश गवळी, भास्कर चव्हाण, दीपक पगार आदींसह बहुसंख्य मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते...असे आहेत नियमनगरपंचायत व ग्रामपंचायतीची परवानगी आवश्यक, स्थापना मिरवणूक व विसर्जन मिरवणुकीला बंदी, मंडप मर्यादित असावा, घरगुती मूर्ती तीन फूट व मंडळाची मूर्ती चार फुटापेक्षा जास्त नसावी, गर्दी टाळावी, थर्मल गन व आॅक्सिमीटर वापरावे, दर्शन आॅनलाइन उपलब्ध करून देण्यासाठी प्राधान्य द्यावे, मंडळ परिसरात रोज निर्जंतुकीकरण करावे, फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळावे. मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा.