‘गोमय होलिकोत्सव’ साजरा करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2019 11:29 PM2019-03-15T23:29:46+5:302019-03-16T00:32:43+5:30
हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी सण येत्या बुधवारी (दि.२१) असून भारतीय संस्कृतीत होळी सणाला मोठे महत्त्व असल्याने सर्वत्र होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळी सणाचे महत्त्व टिकून राहावे, तसेच दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण बसावे यासाठी होळीला वापरल्या जाणाऱ्या गोवºया या भारतीय गोवंश म्हणजेच देशी गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या वापराव्यात व पर्यावरणपूरक होलिकोत्सव उपक्र माला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन गो सेवा समिती तसेच नाशिकमधील सर्व गो-पालक यांच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.
पंचवटी : हुताशनी पौर्णिमा अर्थात होळी सण येत्या बुधवारी (दि.२१) असून भारतीय संस्कृतीत होळी सणाला मोठे महत्त्व असल्याने सर्वत्र होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळी सणाचे महत्त्व टिकून राहावे, तसेच दिवसेंदिवस वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण बसावे यासाठी होळीला वापरल्या जाणाऱ्या गोवºया या भारतीय गोवंश म्हणजेच देशी गायीच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या वापराव्यात व पर्यावरणपूरक होलिकोत्सव उपक्र माला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन गो सेवा समिती तसेच नाशिकमधील सर्व गो-पालक यांच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आले आहे.
गो सेवा समितीची पत्रकार परिषद शुक्र वारी (दि.१५ ) आडगाव नाका येथे संपन्न झाली. होळी सणासाठी विविध मित्रमंडळाचे कार्यकर्ते लाकूड, झाडाचे ओंडके, रबर, टायर, प्लॅस्टिक वस्तू जळून होळी करतात. मात्र यामुळे विषारी धूर निर्माण होतो. यंदा नागरिकांनी, सार्वजनिक मित्रमंडळांनी होळीसाठी देशी गाईच्या शेणापासून तयार करण्यात आलेल्या गोवºया वापराव्या. गेल्या वर्षी विविध सार्वजनिक मित्रमंडळ, सोसायटी यांनी गोमय होळी पर्यावरणपूरक उपक्र माला प्रतिसाद दिला होता.
होळीची राख कचºयात न टाकता तिचा उपयोग करावा विशेष म्हणजे गोसेवा समिती गोपालक यांच्याकडे शेणापासून तयार गोवºया अल्पदरात विक्र ीसाठी उपलब्ध आहे. लोकजागृती, गोवºया जाळण्याचे फायदे, अंधश्रद्धा नव्हे तर विज्ञान पोहोचविण्यासाठी तसेच प्रदूषणावर नियंत्रण यासाठी उपक्र म आहे. नाशिकच्या गुरु जी रु ग्णालय, गीता गोशाळा, नंदिनी डेअरी नागनाथ गोशाळा, मीननाथ गोशाळा, येथे गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोवºया उपलब्ध आहे. पत्रकार परिषदेला रेखा दाणी, महेश शहा, श्रीनिवास गायधनी, योगेश नाशिककर, बाळासाहेब काठे, प्रसाद धोपावकर आदी उपस्थित होते.
गोवºया पर्यावरणपूरक
देशी गायीच्या शेणापासून तयार केलेल्या गोवºयामुळे अनेक गोपालकांना रोजगार प्राप्त होतो तसेच गोवरीच्या ज्वलनामुळे आॅक्सिजनची हवेतील पातळी वाढते त्यामुळे गोमय होळी पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर आहे. होळीनंतर राख शेतात किंवा घरगुती बगीच्या व टेरेस गार्डनमध्ये वापरल्यास उत्तम प्रकारच्या खताचे काम करते.