साहित्य संमेलनाच्या नवीन बोधचिन्ह निर्मितीसाठी आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:12 AM2021-01-10T04:12:15+5:302021-01-10T04:12:15+5:30

नाशिक : यंदाच्या ९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान नाशिकला मिळाला आहे. प्रत्येक संमेलनाची ओळख प्रथमदर्शनी ...

Appeal for the creation of a new logo of the Sahitya Sammelan | साहित्य संमेलनाच्या नवीन बोधचिन्ह निर्मितीसाठी आवाहन

साहित्य संमेलनाच्या नवीन बोधचिन्ह निर्मितीसाठी आवाहन

Next

नाशिक : यंदाच्या ९४ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान नाशिकला मिळाला आहे. प्रत्येक संमेलनाची ओळख प्रथमदर्शनी त्या संमेलनासाठी केलेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याने होत असते. त्यामुळे इच्छुक कलाकारांनी १८ जानेवारीपर्यंत या संमेलनासाठी बोधचिन्ह पाठविण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

यंदा नाशिक जिल्हानिर्मितीला १५१ वर्षे पूर्ण होत आहेत. तसेच गोदेकाठी असलेल्या नाशिक नगरीतील या संमेलनात शहराचा अभिमान, इतिहास आणि कर्तृत्व जगासमोर थोडक्यात मांडायची संधी यानिमित्ताने मिळत आहे. हे सर्व बोधचिन्ह आणि घोषवाक्यात उमटावे अशी आयोजकांची अपेक्षा आहे. घोषवाक्य हे मोजक्या शब्दांत आणि मराठीतच असणे आवश्यक आहे. बोधचिन्ह एकरंगी किंवा बहुरंगी असावे. तसेच १८ जानेवारीपर्यंत बोधचिन्ह आणि घोषवाक्य जमा करायचे आहे. कोणीही १८ वर्षांवरील भारतीय नागरिक, व्यक्ती, समूह स्पर्धेत सहभागी होऊ शकतो. चार चौरस सेंटीमीटरमध्ये चिन्ह बनवायचे आहे. abmss94.nashik@gmail.com या मेल आयडीवर बोधचिन्ह जेपीईजी, जेपीजी, पीएनजी, एसव्हीजी या फॉन्टमध्ये पाठवायचे आहे. स्पर्धकाने स्वत:ची संपूर्ण माहिती फोटोसह मेल करायची आहे. निवड झालेल्या बोधचिन्ह आणि घोषवाक्याचे सर्व हक्क आयोजकांकडे सुरक्षित राहणार आहेत. विजेत्यांना रोख स्वरूपात पारितोषिक देण्यात येणार असल्याचे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.

Web Title: Appeal for the creation of a new logo of the Sahitya Sammelan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.