कांदा अनुदानासाठी कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2019 12:06 AM2019-02-11T00:06:50+5:302019-02-11T00:26:11+5:30
राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान जाहीर केले आहे. या अनुदानासाठी शेतकºयांनी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीशी संपर्क साधावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव यांनी केले आहे.
मालेगाव : राज्य शासनाने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना २०० रुपये प्रतिक्विंटल अनुदान जाहीर केले आहे. या अनुदानासाठी शेतकºयांनी मालेगाव कृषी उत्पन्न बाजार समितीशी संपर्क साधावा असे आवाहन बाजार समितीचे सभापती राजेंद्र जाधव यांनी केले आहे.
१ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यावर अनुदान दिले जाणार आहे. बाजार समितीच्या झोडगे उपबाजारात व मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावर कांदा विक्री केलेल्या शेतकºयांना अनुदान दिले जाणार आहे. शेतकºयांनी अनुदान मिळणेसाठीचा अर्ज, कांदा पिकाची नोंद असलेला ७/१२ उतारा, बॅँक पासबुकची झेरॉक्स (राष्टÑीयकृत बॅँक), आधारकार्ड, ज्या शेतकºयांचे नावाने ७/१२ उतारा आहे त्याच नावाची कांदा विक्रीची हिशेब पावती जमा करावी. झोडगे उपबाजार आवारात कांदा विक्री केलेल्यांनी झोडगे उपबाजार कार्यालयात तर मुंगसे कांदा केंद्रावर कांदा विक्री केलेल्या शेतकºयांनी मुंगसे कांदा खरेदी विक्री केंद्रावरच कागदपत्रे १५ फेब्रुवारी २०१९ पर्यंत जमा करावीत.