भाविकांना बाहेरून दर्शन घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 08:29 PM2021-03-01T20:29:28+5:302021-03-02T01:20:25+5:30
लोहोणेर : सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून, याची खबरदारी घ्यावी म्हणून मंगळवारी अंगरिका चतृर्थीच्या दिवशी सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मंदिर गाभाऱ्यात गर्दी न करता बाहेरून श्रीचे दर्शन घ्यावे, असे आवाहन ठेंगोडा येथील स्वयंभू सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष यशवंत पाटील यांनी भाविकांना केले आहे.

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेला व नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती असलेला स्वयंभू सिद्धिविनायकाची सर्वत्र ख्याती आहे. परंतु राज्यात व जिल्ह्यात सर्वत्र वाढता कोरोनाचा संसर्ग लक्षात घेता शासनाने काही नियम व अटी घालून दिलेल्या आहेत. त्याआनुषंगाने संबंधित नियमांचे पालन करावे व प्रत्येकाने आपली व कुटुंबातील व्यक्तींची जबाबदारी लक्षात घेता श्रीच्या दर्शनासाठी मंदिरात गर्दी करू नये. दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकांनी व्यवस्थापन मंडळास सहकार्य करावे, असे आवाहन ट्रस्ट मंडळाने केले आहे. (०१ लोहोणेर)