समाधानकारक पाऊस पडल्या शिवाय पेरणी न करण्याचे शेतकऱ्यांना आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2021 07:38 PM2021-06-02T19:38:31+5:302021-06-03T00:14:01+5:30
मानोरी : सध्या मान्सून पूर्व पाऊस पडत असला तरी शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय खरीप हंगामातील कोणत्याही प्रकारचा पिकांची पेरणी करू नये असे आवाहन येवला कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
मानोरी : सध्या मान्सून पूर्व पाऊस पडत असला तरी शेतकऱ्यांनी ८० ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय खरीप हंगामातील कोणत्याही प्रकारचा पिकांची पेरणी करू नये असे आवाहन येवला कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
दि. २ ते ४ जून या कालावधीमध्ये कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता असून, दि ५ जून रोजी विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जना व विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खाते, कृषी हवामान शास्त्र विभाग, पुणे यांनी वर्तवली आहे. सोयाबीन, तूर, भुईमूग व मका या पिकांच्या नियोजना करता पेरणीची पूर्वतयारीची कामे करावीत.
भात पिकासाठी रोपवाटिकाची पूर्वतयारी चालू ठेवावी. खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन या पिकांसाठी जमिनीच्या प्रकारानुसार जमिनीची निवड पूर्व मशागतीची कामे करावीत. सोयाबीन, कापूस, तूर, उडीद, मूग, मका या खरीप पीक पेरणीसाठी शेतजमीन नांगरणी व वाखराच्या पाळ्या देऊन तयार करावी.
सर्व शेतकऱ्यांनी किमान ८० ते १०० मिलिमीटर इतका पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. अपुऱ्या ओलाव्यावर पेरणी केल्या नंतर पावसाचा खंड झाल्यास पेरणी वाया जाऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असे आवाहन महाराष्ट्र शासन कृषी विभाग येवला मार्फत करण्यात येत आले असल्याची माहिती पिंपळगाव लेप येथील कृषी सहायक साईनाथ कालेकर यांनी केले आहे.