ओझर पोलिस ठाण्यामार्फत वाहनांची ओळख पटवण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2020 02:11 PM2020-10-22T14:11:51+5:302020-10-22T14:12:44+5:30

ओझर: पोलीस ठाण्यात पडून असलेल्या बेवारस व अनेक गुन्ह्यांमध्ये जप्त असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या मालकांचा शोध लावण्याचे पोलिस ठाण्यामार्फत वाहनांची ओळख पटविण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे.

Appeal to identify vehicles through Ojhar police station | ओझर पोलिस ठाण्यामार्फत वाहनांची ओळख पटवण्याचे आवाहन

ओझर पोलिस ठाण्यामार्फत वाहनांची ओळख पटवण्याचे आवाहन

googlenewsNext

ओझर: पोलीस ठाण्यात पडून असलेल्या बेवारस व अनेक गुन्ह्यांमध्ये जप्त असलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांच्या मालकांचा शोध लावण्याचे पोलिस ठाण्यामार्फत वाहनांची ओळख पटविण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदशर्नाखाली ओझर पोलीस ठाण्याला सूचित करण्यात आले आहे की अनेक वर्षांपासून ओझर पोलीस ठाण्यात बेवारस अनेक गुन्ह्यात जप्त करण्यात आलेली आहेत. मात्र न्यायालयीन प्रक्रिया व वाहनांचे मालक मिळून येत नसल्याने अनेक वाहने पडून आहेत.त्यामुळे पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात जागा व त्यापोलिस ठाण्याचे परिसर विचित्र दिसून येत आहे. हीच बाब लक्षात घेऊन विशेष पोलिस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी पुढाकार घेऊन बेवारस वाहन मालकांचा शोध घेण्यासाठी पुढाकार घेऊन पुण्यातील गंगामाता वाहन शोध संस्था यांच्या मदतीने ५५ मूळ मालकांचा शोध लावण्यात आला आहे.नाशिक ग्रामीण अप्पर पोलिस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, उपअधीक्षक अर्जुन भोसले, व पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी वाहन मालकांना आपली वाहने ओळख पटवून पुरावे देऊन वाहन परत घेऊन जाण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर एक आठवडाभराच्या मुदतीत अशी वाहने ओळख पटवून घेऊन न गेल्यास ती बेवारस समजून सदर वाहनांचा लिलाव करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांनी सांगितले आहे.

Web Title: Appeal to identify vehicles through Ojhar police station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक