अंगणगाव, गंगादरवाजा येथेच गणेश विसर्जन करण्याचे आवाहन

By admin | Published: September 26, 2015 09:59 PM2015-09-26T21:59:19+5:302015-09-26T21:59:43+5:30

अंगणगाव, गंगादरवाजा येथेच गणेश विसर्जन करण्याचे आवाहन

Appeal to immerse Ganesha at Angangagaon, Gangadarwaja | अंगणगाव, गंगादरवाजा येथेच गणेश विसर्जन करण्याचे आवाहन

अंगणगाव, गंगादरवाजा येथेच गणेश विसर्जन करण्याचे आवाहन

Next

येवला : गणेशोत्सव परंपरेत पण कायद्याचे उल्लंघन न करता साजरा करा, असे आवाहन करीत रात्री १२ वाजेच्या आत गणेश विसर्जन मिरवणूक आटोपण्याचे आवाहन येथे झालेल्या शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आले. अंगणगाव येथील अहल्योदवी घाट तसेच गंगादरवाजा येथे तयार केलेल्या गणेशकुंडातच विसर्जन करून पर्यावरणाचा ऱ्हास टाळावा, असे आवाहन तहसीलदार शरद मंडलिक यांनी केले.
गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस ठाण्यात आयोजित शांतता कमिटी व गणेश मंडळ सदस्यांच्या बैठकीत मनमाड विभागाचे पोलीस उपअधीक्षक डॉ. राहुल खाडे, तहसीलदार शरद मंडलिक, नगराध्यक्ष प्रदीप सोनवणे, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ. राहुल वाघ, पोलीस निरीक्षक दीपककुमार वाघमारे आदिंनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी आदिंनी शिस्तीत मिरवणूक पार पाडण्याचे आवाहन केले. यावेळी नागरिकांनी आझाद चौकात प्रत्येक मंडळाला अधिक वेळ मिळावा, लक्कडकोट भागातील झुलत असलेल्या इलेक्ट्रिक तारांना ताण देऊन ओढून घ्याव्यात या महत्त्वपूर्ण सूचना कार्यकर्त्यांनीही केल्या. विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी शहराला पाणीपुरवठा करावा, वीजपुरवठा खंडित होऊ देऊ नये, पोलिसांनी मंडळांना सहकार्य करावे, पालिकेने मुख्य विसर्जन मार्गावरील खड्डे बुजवावे तसेच बंद पथदीप सुरू करावेत आदि मागण्या यावेळी करण्यात आल्या. माजी नगराध्यक्ष भोलानाथ लोणारी यांनी, आमच्या मंडळाचे यंदाचे मानाचे १२७वे वर्ष असून, आम्ही वेळेत मिरवणुकीला सुरुवात करू, असे सांगतानाच आझाद चौकात कसरती व खेळ सादर करण्यासाठी इतर मंडळांनाही वेळ मिळेल याची काळजी घेऊ, असे स्पष्ट केले. भाजपाचे शहराध्यक्ष मनोज दिवटे यांनी पोलिसांनी कार्यकर्त्यांना दमदाटी करण्यापेक्षा नम्रतेने सूचना कराव्यात, असे आवाहन केले. गणेशोत्सव व ईद शांततेत साजरा करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य केल्याबद्दल येवलेकरांचे पोलीस अधिकाऱ्यांनी आभार मानले. विसर्जन मिरवणूकही शांततेत पार पडेल, असा विश्वास यावेळी उपस्थित असलेले आधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. योवळी प्रमोद सस्कर, मध्यवर्ती गणेश मंडळाचे अध्यक्ष किशोर सोनवणे, भूषण शिनकर आदिंनी यावेळी मनोगत व्यक्त केले. बैठकीचे सूत्रसंचालन राहुल लोणारी यांनी केले.(वार्ताहर )

Web Title: Appeal to immerse Ganesha at Angangagaon, Gangadarwaja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.