अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:23 AM2018-07-04T00:23:08+5:302018-07-04T00:23:34+5:30
सिन्नर : मागील काही दिवसांपासून काही समाजकंटक व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याची किंवा चोर आल्याच्या अफवा पसरवित आहेत.
Next
ठळक मुद्दे कायदा हातात घेण्याआधी पोलिसांशी संपर्क साधावा,
सिन्नर : मागील काही दिवसांपासून काही समाजकंटक व्हॉट्सअॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून मुले पळवणारी टोळी सक्रिय झाल्याची किंवा चोर आल्याच्या अफवा पसरवित आहेत. अफवांमुळे इतर जिल्ह्यात जमावाकडून बहुरूपी, वाटसरू, भिकारी व अन्य निष्पाप लोकांना जबर मारहाणीचे प्रकार घडले आहेत. तर काही घटनांत खून झाले आहेत. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन सिन्नर ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी केले आहे. कायदा हातात घेण्याआधी पोलिसांशी संपर्क साधावा, असे देशमुख यांनी स्पष्ट केले.