बाधितांच्या संपर्कात न येण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:12 AM2021-04-19T04:12:49+5:302021-04-19T04:12:49+5:30
सौंदाणे ग्रामपंचायतीने ग्रामस्थांची पंधरा दिवसांची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार गावात सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत किराणा ...
सौंदाणे ग्रामपंचायतीने ग्रामस्थांची पंधरा दिवसांची नियमावली जाहीर केली आहे. त्यानुसार गावात सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत किराणा व अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू राहतील. सोमवार, बुधवार व शुक्रवार असे तीन दिवस सकाळी सात ते दुपारी बारा वाजेपर्यंत भाजीपाला खरेदी करता येईल. पन्नास वर्षांपुढील नागरिकांनी घराबाहेर पडू नये. अनोळखी व्यक्तींच्या संपर्कात येऊ नये. कारण जवळचे लोक आपण बाधित असल्याचे सांगत नाहीत. बाहेरगावच्या नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच गावात यावे. दवाखाने व औषध विक्रीची दुकाने सुरू राहतील. आपल्याला माहीत असलेल्या रुग्णाच्या संपर्कात पंधरा दिवस येऊ नये. गावात शनिवार आणि रविवारी कर्फ्यु असेल, असे सरपंच डॉ. पवार यांनी सांगितले.