नियमांचे पालन करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:08 AM2017-08-24T00:08:51+5:302017-08-24T00:09:11+5:30

गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर बुधवारी येथील पंचायत समिती सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी मार्गदर्शन केले.

 Appeal to obey the rules | नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नियमांचे पालन करण्याचे आवाहन

googlenewsNext

सटाणा : गणेशोत्सव आणि ईदच्या पार्श्वभूमीवर बुधवारी येथील पंचायत समिती सभागृहात शांतता समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी मार्गदर्शन केले. गणेशोत्सव काळात मंडळाचे कार्यकर्ते वीज चोरी, जुगार खेळताना आढळल्यास तसेच ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी ध्वनीक्षेपक वापराच्या नियमांचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोद्दार यांनी स्पष्ट केले.दरम्यान पोलीस निरीक्षक हिरालाल पाटील, सहायक पोलीस अधीक्षक शशिकांत शिंदे यांनी गणेश मंडळांसाठी पोलीस विभागाकडून आदर्श मंडळ बक्षीस योजनेची माहिती दिली. विद्या सोनवणे, सरोज चंद्रात्रे, लालचंद सोनवणे, शैलेश सूर्यवंशी, विलास बच्छाव, मंगेश खैरनार, सचिन दशपुते, भीमराव पवार यांनीही मनोगत व्यक्त केले. बैठकीस उपनगराध्यक्ष पुष्पा सूर्यवंशी, संदीप सोनवणे, नगरसेवक निर्मला भदाणे, नितीन सोनवणे, मनोहर देवरे, पंकज सोनवणे, श्यामकांत बगडाणे, बापू अमृतकर, स्वप्नील बागड, अनिल उलके, तुषार कापसे आदी उपस्थित होते.
नगराध्यक्ष सुनील मोरे यांनी पालिका प्रशासनातर्फे गणेश मंडळांसाठी बक्षीस योजना जाहीर केली. तसेच पर्यावरण राखण्याच्या दृष्टीने पालिका प्रशासनानेदेखील पावले उचलली असून, लवकरच शहरात गणेश विसर्जनासाठी गणेशकुंड निर्मितीच्या कामाला सुरुवात करण्यात येणार असल्याची माहिती दिली. तसेच गावात अपघात टाळण्यासाठी ठिकठिकाणी फायबरचे गतिरोधक बसविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. उत्सव निर्विघ्नपणे पार पडण्यासाठी मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यात येईल असेही शेवटी मोरे यांनी सांगितले.


 

Web Title:  Appeal to obey the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.