सोशल डिस्टन्सिंग पाळण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2020 09:00 PM2020-08-12T21:00:21+5:302020-08-13T00:10:46+5:30
पाटणे : येथे तीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या पाच झाली आहे. ग्रामस्थांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने केले आहे.
पाटणे : येथे तीन कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने बाधितांची एकूण संख्या पाच झाली आहे. ग्रामस्थांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन ग्रामपंचायत व आरोग्य विभागाने केले आहे.
पाटणे येथील त्रिमूर्ती चौकातील ३२ वर्षीय महिला माळवाडी येथे गेल्याने कोरोना विषाणू संसर्ग होऊ बाधित झाल्याचा अहवाल प्राप्त झाला. सोबत त्यांच्या दोन्ही ११ व १३ वर्षीय मुलींचाही अहवाल पॉझिटिव्ह आला. तिघांना देवळा येथील कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे.
बाधित रूग्णांच्या घरातील तीन व्यक्तीच्या घशाचे नमुने घेण्यासाठी दाभाडी येथील कोवीड केअर सेंटर येथे दाखल करण्यात आले आहे. पाटणे येथील बाधित रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच असून ग्रामस्थांनी शासन नियमांचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. मास्क वापरणे, सोशल डिस्टन्स पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे, हात धुणे आदी नियमांचे पालन करावे असे आवाहन माजी सरपंच सुभाष अहिरे, संदेश खैरनार, तुषार वाघ, आरोग्य अधिकारी डॉ. सारिका मेरगळ, डॉ. निरज बच्छाव, आरोग्यसेविका सुरेखा देवरे, अरूण पाटील, नाना निकम , आशा सेविका मनिषा ञिभुवन, जयश्री विखे, कविता खैरनार, वैशाली बागुल यांनी केले आहे. दरम्यान पाटणे येथील आठवडे बाजारात सोशल डिस्टनसिंगचा बोजवारा उडाला होता.