बॅँकेत खाते उघडण्यासंदर्भात अधिकायांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2018 12:11 AM2018-02-26T00:11:10+5:302018-02-26T00:11:10+5:30
येथील भारतीय स्टेट बॅँकेत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकरिता दोन हजार रुपये भरूनच खाते उघडावे अशी सक्ती बॅँकेचे अधिकारी करीत असल्याने गोरगरीब जनतेने कुठून एवढे पैसे आणायचे असा प्रश्न निर्माण झाला असून, याबाबत त्वरित विचार करावा,
चांदवड : येथील भारतीय स्टेट बॅँकेत विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीकरिता दोन हजार रुपये भरूनच खाते उघडावे अशी सक्ती बॅँकेचे अधिकारी करीत असल्याने गोरगरीब जनतेने कुठून एवढे पैसे आणायचे असा प्रश्न निर्माण झाला असून, याबाबत त्वरित विचार करावा, अशी मागणी दलित सेना जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ अहिरे यांनी प्रांत सिद्धार्थ भंडारे, तहसीलदार डॉ. शरद मंडलिक व बॅँक व्यवस्थापकांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर राजाभाऊ अहिरे, सचिन बागुल, तय्यब खान, संदीप अहिरे, रबिया शहा, कमरुन्निसा शेख, राजेंद्र पगार, सागर गोडबोले यांच्या सह्या आहेत. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळेल या अपेक्षेवर विद्यार्थी अर्ज करतात. काही कुटुंबात चार मुले, मुली असे पाच जण आहेत. त्या कुटुंबातील एक व्यक्ती कमविणारी आहे व मोलमजुरी करीत असताना आठ ते दहा हजार रुपये कुठून आणायचे ? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बॅँकेच्या खात्यासाठी दोन हजार रुपयांची सक्ती केली जाते. आता तर नव्याने बॅँकेत खाते उघडण्याचा फॉर्मच मिळत नाही, बाहेर जाऊन आॅनलाइन फॉर्म भरावा लागतो.