पत्रलेखन जोपासण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2019 03:22 PM2019-11-22T15:22:53+5:302019-11-22T15:23:12+5:30
सटाणा:लोप पावत चाललेले पत्रलेखन विद्यार्थ्यांनी जाणीवपुर्वक जोपासावे असे प्रतिपादन डाक अधिक्षक डी. एस. यु. नागेश्वरा रेड्डी यांनी केले. ते आदिवासी विकास विभागाच्या अजमिर सौंदाणे येथील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये बोलत होते.
सटाणा:लोप पावत चाललेले पत्रलेखन विद्यार्थ्यांनी जाणीवपुर्वक जोपासावे असे प्रतिपादन डाक अधिक्षक डी. एस. यु. नागेश्वरा रेड्डी यांनी केले. ते आदिवासी विकास विभागाच्या अजमिर सौंदाणे येथील एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कुलमध्ये बोलत होते. या सोबतच डाक विभागामार्फत चालविल्या जात असलेल्या विविध योजना जसे सुकन्या समृद्धी योजना, पोस्ट बँक, पी. एल. आय. इ. विविध योजनांची माहिती दिली या प्रसंगी पोस्ट उपविभागीय निरिक्षक धनराज उमाले, डाकसेवक डी. बी. चिंचोले व पी. एस. बैरागी यांनीही मार्गदर्शन केले.
कार्यक्र माच्या सुरवातीस शाळेचे प्राचार्य अशोक बच्छाव यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्र माचे सुत्रसंचलन निलेश कुलकर्णी यांनी केले. याप्रसंगी राजू गोळेसर, प्रमोदगीर गोसावी, संतोष जगताप, श्रीम. सारिका घाडगे, गणेश गायसमुद्रे, अख्तरखान पठाण, सुदर्शन देवरे, राहूल राठोड, श्रीम. स्वाती पगार, सुरेश पवार, शिवाजी देवरे, रविंद्र बोराडे, सर्व विद्यार्थी तसेच परिसरातील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.(21 पोस्ट आॅफिस)