कांदा निर्यात मूल्य कमी करण्याचे आवाहन

By admin | Published: June 24, 2014 08:38 PM2014-06-24T20:38:25+5:302014-06-25T00:15:50+5:30

कांदा निर्यात मूल्य कमी करण्याचे आवाहन

Appeal to reduce onion export value | कांदा निर्यात मूल्य कमी करण्याचे आवाहन

कांदा निर्यात मूल्य कमी करण्याचे आवाहन

Next



देवळा : केंद्र शासनाने कांद्याच्या निर्यातमूल्यात वाढ करून ती ३00 डॉलर प्रतिटन इतकी केल्याने त्याचा बाजारभावावर परिणाम झाला असून, शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत असल्याने निर्यात मूल्य कमी करावे, अशी मागणी देवळा बाजार समितीचे संचालक जगदीश पवार यांनी निवेदनाद्वारे केली असून, तशा आशयाचे निवेदन केंद्रीय वाणिज्य मंत्री व कृषी मंत्री यांना पाठविले आहे.
निवेदनाचा आशय असा : महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु गत काही वर्षापासून गारपीठ, दुष्काळ, रोगराई आदिंमुळे कांदा उत्पादनावर मोठा परिणाम झाला असून, काद्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कांद्याचे उत्पादन यावर्षी नैसर्गिक आपत्तींमुळे घटले आहे. केंद्र शासनाने कांदा निर्यातमूल्य वाढविल्याने बाजारपेठेतील कांद्याचे बाजार कमी झाल्याने हा बाजारभाव शेतकऱ्यांना परवडत नाही. केंद्र शासनाने कांदा निर्यातमूल्य कमी करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. (वार्ताहर)

Web Title: Appeal to reduce onion export value

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.