शेतमाल टप्प्याटप्प्याने विक्रीस आणण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:14 AM2021-05-24T04:14:43+5:302021-05-24T04:14:43+5:30
खरिपाच्या पेरणीसाठी आर्थिक अडचण येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कांदा विक्री करण्याची शेतकऱ्यांची मानसिकता आहे. साठवलेल्या कांद्याची विक्री करण्यासाठी घाई ...
खरिपाच्या पेरणीसाठी आर्थिक अडचण येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर कांदा विक्री करण्याची शेतकऱ्यांची मानसिकता आहे. साठवलेल्या कांद्याची विक्री करण्यासाठी घाई न करता, सहा महिन्यात विक्रीचे नियोजन करुन टप्प्याटप्प्याने कांदा विक्रीसाठी आणावा. यामुळे वेळोवेळी चलन उपलब्ध होईल. आगामी काळात साठवणूक केलेल्या कांद्याच्या भावात तेजी राहण्याची शक्यता असली तरी लागवडीपासून काढणीपर्यंत अवकाळी पावसाचा तडाखा बसलेला कांदा खराब होण्याची स्थितीदेखील शेतकरी बांधवांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. कोरोना संसर्गाच्या परिस्थितीत गेल्या वर्षभरात समाजातील सर्व घटकांमध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात ससेहोलपट झाली आहे. कधी बाजार समित्या बंद, तर कधी खत दरवाढ अशा संकटांचा सामना करतांना, शेतकऱ्यांसाठी बंधनकारक करण्यात आलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह अहवाल सादर करण्याची अटदेखील जाचक असल्याचे जाधव यांनी सांगितले.