सोनांबे येथील बंधाऱ्याची चौकशी करण्याची मागणी तक्रार : तहसीलदार व गटविकास अधिकाºयांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 05:51 PM2018-08-23T17:51:26+5:302018-08-23T17:51:40+5:30
सिन्नर : तालुक्यातील जीवनदायी समजल्या जाणाºया देवनदीवरील सोनांबे गावातील भैरवनाथ मंदिराजवळील खलाल बंधाºयाला भगदाड पडून गळती लागल्याने त्यातील पाणी वाहून जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदार व गटविकास अधिकाºयांकडे केली आहे. या बंधाºयांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी निवेदनात करण्यात आली आहे.
ेसिन्नर : तालुक्यातील जीवनदायी समजल्या जाणाºया देवनदीवरील सोनांबे गावातील भैरवनाथ मंदिराजवळील खलाल बंधाºयाला भगदाड पडून गळती लागल्याने त्यातील पाणी वाहून जात असल्याची तक्रार ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे तहसीलदार व गटविकास अधिकाºयांकडे केली आहे. या बंधाºयांची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी निवेदनात करण्यात आली आहे.
दोन वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेमार्फत देवनदीवर सदर बंधाºयाचे बांधकाम करण्यात आले होते. बांधकाम सुरु असतांनाच सदर काम निकृष्ट होत असल्याची तक्रार शिवसेनेचे ठाणगाव गट प्रमुख जनार्दन लक्ष्मण पवार यांनी केली होती असे निवेदनात म्हटले आहे. ग्रामपंचायत सदस्य व काही ग्रामस्थांनी संबंधित अधिकाºयांना कामाच्या दर्जाबाबत तक्रार करुन क्वालिटी रिपोर्ट सादर करा अन्यथा काम थांबवा अशी भूमिकाही घेतली होती. मात्र संबंधितांनी या प्रकरणावर पडदा टाकून पुन्हा काम सुरु केले. त्यामुळेच सदर परिस्थिती उद्भवल्याचे निवेदनात म्हटले आहे. गेल्या रविवारी देवनदी दुथडी भरुन वाहात असतांना बंधाºयाला भगदाड पडून लाखों लिटर पाणी नदीतून वाहून जात आहे. त्यामुळे झालेल्या या कामाची चौकशी करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
त्याचबरोबर हरसुले फाटा ते सोनांबे रस्त्याचे काम गेल्या तीन महिन्यांपूर्वी झाले आहे. या कामाचीही चौकशी करण्याची मागणी जनार्दन पवार, संजय अर्जून बोडके, दामू दगडू बोडके व सुरेंद्र बैरागी यांनी तहसीलदार नितीन गवळी व गटविकास अधिकारी लता गायकवाड यांची भेट घेऊन केली. निवेदनावर मच्छिंद्र डगळे, इब्राहिम शेख, गोविंद कडभाने, शाम पवार, समाधान बोडके, केशव पवार, सुरेश जगताप, माधव डावरे, अनिल पवार यांच्यासह सोनांबे येथील ग्रामस्थांची नावे व स्वाक्षºया आहेत.