कारपेवाडीतील खूनप्रकरणी तहसीलदारांना निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 05:40 PM2019-01-29T17:40:16+5:302019-01-29T17:41:38+5:30
कारपेवाडी येथील महाविद्यालयीन युवतीची गळा चिरून हत्या करणाऱ्या खून्याचा शोध घेवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अशा मागणीचे निवेदन नाभिक महामंडळाच्या सिन्नर शाखेतर्फे सोमवार (दि.२८) रोजी तहसीलदारांना देण्यात आले.
कारपेवाडीतील येथील भाग्यश्री उर्फ सोनाली संतोष माने (१७) या महाविद्यालयीन युवतीचा भरदिवसा धरदार शस्त्राने अमानुषपणे गळा चिरून हत्या करण्यात आली. पोलिसांनी संबधित खुन्याचा त्वरीत शोध घेवून त्याला फाशीची शिक्षा द्यावी, अन्यथा समाज्याच्यावतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला आहे. माने कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. या कुटुंबाला शासनाने त्वरीत आर्थिक मदत करावी. न्यायलयीन कामकाजासाठी सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी. आरोपी गजाआड होत नाही तोपर्यंत माने कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, अशा मागण्या या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर नाभिक समाजाचे जिल्हाध्यक्ष सुरेश सुर्यवंशी, समाज युवा सेनेचे अध्यक्ष अतुल चव्हाण, तालुकाध्यक्ष महेंद्र कानडी, युवा सेना तालुकाध्यक्ष वाल्मिक शिंदे, शहराध्यक्ष पांडुरंग संत यांच्यासह समाज बांधवांच्या स्वाक्ष-या आहेत.