राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2020 02:19 PM2020-03-03T14:19:09+5:302020-03-03T14:20:14+5:30
पिंपळगाव बसवंत :- पिंपळगाव बसवंत शहरात येत्यादि.१२ मार्च रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची सार्वजनिक जयंती राजे ग्रुप व जाणता राजा मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न होणार आहे. या सार्वजनिक शिवजयंती उत्सवात कृष्ण लीला ,विठ्ठल गजर,तानाजी मालुसरे,पंजाबी नृत्य,संभाजी राजे, दिव्य रथातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळ्याचा देखावा असे एकूण सहा देखावे पिंपळगाव बसवंत शहरात सार्वजनिक शिवजयंती दरम्यान असणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे
.
पिंपळगाव बसवंत राजे ग्रुप तर्फे व जाणता राजा मित्र मंडळ यांची शिवजयंती निमित्तनियोजन बैठक शहरातील कालिका माता मंदिरात राजे ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सुजित मोरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.त्यावेळी नियोजनाची माहिती देण्यात आली.
प्रारंभी सकाळी छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी मिरवणूक व त्यानंतर शेकडो मोटारसायकल रॅलीने शहरातील प्रत्येक मंडळाचे पूजन राजे ग्रुपच्या वतीने संपन्न होणार आहे
तसेच पोलीस निरीक्षक संजय महाजन यांनी जयंती दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मार्गदर्शन केले. जयंती दरम्यान दारू, गुटका ,व्यसन टाळा .
मिरवणुकीत फक्त महाराजांचीच गाणी लावा जेणेकरून शिवजयंतीचे वातातवरन टिकून राहील.शहरात रस्त्याची कामे सुरू आहे त्यामुळे वाहनांचे गोंधळ होणार नाही यासाठी जादा कर्मचारी तैण्यात करण्यात येणार आहे त्यासाठी नागरिकांनी देखील सहकार्य करणे गरजेचे आहे असे यावेळी महाजन यांनी सांगितले
यावेळी पंचायत समिती सदस्य राजेश पाटील,सत्यजित मोरे,संतोष गांगुर्डे,प्रवीण घुमरे,किरण लभडे ,स्नेहल पाटील ,ऋषी शिंदे, गणेश डेरे,अमोल बिडवे,धनंजय साखरे,सागर कदम,प्रवीण जाधव ,हर्षल जाधव,योगेश कायस्थ, रोशन सूर्यवंशी, अशोल आहेर,सलीम शेख,सचिन काळे,रामा वाघ,आकाश तिडके,रोशन भालेराव,नंदू मोरे, आदि उपस्थित होते.