लोकवर्गणीतून बदलले पोलीस ठाण्याचे रूपडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 11:23 PM2020-09-05T23:23:47+5:302020-09-06T00:47:41+5:30
सिन्नर : कोर्टाची व पोलीस ठाण्याची शहाण्याने पायरी चढू नये, असे म्हणतात. मात्र याला वावी पोलीस ठाणे अपवाद ठरले आहे. येथील पोलीस ठाण्याची इमारत व परिसराचे मनमोहक रूप पाहून निसर्गरम्य ठिकाणी आलो, असा भास अभ्यागतांना निर्माण होतो. पोलिसांच्या उपक्रमशीलतेला लोकसहभागाची साथ लाभल्याने परिसराचे रूपडे बदलले आहे.
शैलेश कर्पे।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिन्नर : कोर्टाची व पोलीस ठाण्याची शहाण्याने पायरी चढू नये, असे म्हणतात. मात्र याला वावी पोलीस ठाणे अपवाद ठरले आहे. येथील पोलीस ठाण्याची इमारत व परिसराचे मनमोहक रूप पाहून निसर्गरम्य ठिकाणी आलो, असा भास अभ्यागतांना निर्माण होतो. पोलिसांच्या उपक्रमशीलतेला लोकसहभागाची साथ लाभल्याने परिसराचे रूपडे बदलले आहे.
आतापर्यंत आलेल्या अनेक प्रभारी अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यानंतर तत्कालीन सहाय्यक निरीक्षक रणजीत आंधळे यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आणि इमारत मिळाली. सुमारे वर्षभरापूर्वी वावी पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारीपदी सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांची नियुक्ती झाली. पोलीस ठाण्याची इमारत तर देखणी होती. मात्र परिसराचे रूप बदलण्यासाठी त्यांनी अगोदर कर्मचारी आणि त्यानंतर हद्दीतील नागरिकांना विश्वास घेऊन परिसराचा कायापालट करण्याचा निर्धार केला. लोकवर्गणी जमल्यानंतर पोलीस ठाण्याच्या ५८ गुंठे जागेला कंपाउण्ड उभे केले. दोन प्रवेशद्वार उभारले. कंपाउण्डच्या आत आंबे, चिकू, नारळ, चिंच, निंबोणी यांच्यासह शेकडो फळाफुलांची लागवड केली.
मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संरक्षक जाळ्या बसविण्यात आल्या. मैदानाचे सपाटीकरण करण्यासह व्हॉलिबॉलचे मैदान तयार केले.
पोलीस ठाण्यासमोर अपघातग्रस्त वाहनांचे प्रदर्शन हटवून सर्व वाहने पोलीस ठाण्याच्या मागे शिस्तीत लावून मुद्देमाल व्यवस्थित लावण्यात आल्याने पोलीस ठाण्याचा चेहरा-मोहरा बदलला आहे.
इमारतीतही सुविधा
पोलीस ठाण्याच्या इमारतीत महिला कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र विश्रामगृह, स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेºयात कैद करण्यात आला आहे. अभ्यागतांसाठी बसण्याची स्वतंत्र बाके आहेत.अधिक्षकांकडून कौतूक
वावी पोलीस ठाण्याचे बदलले रूप पाहून माजी जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. आरती सिंह, अपर अधीक्षक शर्मिष्टा घारगे-वालावलकर, पोलीस उपविभागीय अधिकारी माधव पडिले (रेड्डी) यांनी प्रत्यक्ष भेट देऊन कामाचे कौतुक केले. नियुक्ती झालेल्या ठिकाणी केवळ
तितकी वर्षे पगारापुरते काम न करता त्या गावासाठी व खात्यासाठी वावी
पोलीस ठाण्याच्या अधिकाºयांनी व कर्मचाºयांनी केलेल्या कामाचे कौतुकाचा विषय झाले आहे. पोलीस ठाण्याची प्रशस्त वास्तू झाली होती. मात्र परिसराचे रूप बदलणे आवश्यक होते. वरिष्ठ अधिकाºयांचे मार्गदर्शन घेऊन परिसराचे रूप बदलण्याचा निर्धार केला. पोलीस कर्मचाºयांनी व लोकांनी मदत केली. लोकवर्गणीतून सर्व कामे करण्यात आली.
- रणजीत गलांडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, वावी
पोलीस ठाणे