पावसाळ्यात रस्त्याला तळ्याचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2020 04:02 PM2020-09-16T16:02:09+5:302020-09-16T16:03:48+5:30
मानोरी : नाशिक - औरंगाबाद राज्यमहामार्गा लगत असलेल्या मानोरी बुद्रुक परिसरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. नाशिक - येवला महामार्गाला मिळणाऱ्या मुखेड फाटा ते मानोरी बुद्रुक साडेचार किलोमीटर आणि देशमाने, मानोरी बुद्रुक ते मुखेड या पाच किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर देखील खड्डे आणि काटेरी झुडपाच्या अतिक्र मणांमुळे वाहन चालकांना रहदारी करणे दुरापास्त होत आहे. मानोरी ते खडकीमाळ या एक ते दीड किलोमीटर अंतराच्या रस्त्याची अवस्था देखील दयनीय झाली असून या रस्त्याचे दगड - गोटे विस्कटू लागले आहेत. पावसाळ्यात या रस्त्याना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

मानोरी परिसरातील रस्त्याने प्रवास करताना खड्डेमय रस्त्यांमुळे चार चाकी वाहनाचे पाटे तुटणे, नट बोल्ट गळून पडणे, वाहनांमध्ये बिघाड होणे असे प्रकार या रस्त्यावर वारंवार घडत आहे. तसेच खड्यांमुळे अनेक वाहनचालकांना मणक्याचे, पाठीचे आजार देखील उद्भवले आहे. त्यात रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या काटेरी झुडपांनी साईडपट्या व्यापलेल्या असल्याने दोन मोठ्या वाहनांना शेजारून जाताना कसरत करावी लागत आहे.
चौकट ...
वाहनांना सफेद एलईडी बल्प वापरत असल्याने ग्रामीण भागात रस्त्याच्या अरु ंद स्थितीमुळे अपघातात नेहमी वाढ होत आहे. मानोरी - मुखेड आणि मानोरी - मुखेड फाटा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अनेक खड्यांंचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे वारंवार वाहनांमध्ये बिघाड देखील होत आहे. सदर रस्त्यांची तातडीने डागडुजी अथवा डांबरीकरण करण्याची मागणी केली जात आहे. तर मुखेड फाट्यावर गतिरोधक बसविण्याची मागणी नागरीकांनी केली आहे.