विल्होळीत बिबट्या मादीसह दोन बछड्यांचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:11 AM2021-06-22T04:11:21+5:302021-06-22T04:11:21+5:30
प्रतिक्रिया=== या ठिकाणी खाण असल्याने तसेच पिण्याच्या पाण्याची सोय असल्याने बिबट्याला लपायला जागा आहे. कामासाठी रात्री-अपरात्री यावे-जावे लागते. कधी ...
प्रतिक्रिया===
या ठिकाणी खाण असल्याने तसेच पिण्याच्या पाण्याची सोय असल्याने बिबट्याला लपायला जागा आहे. कामासाठी रात्री-अपरात्री यावे-जावे लागते. कधी उशीर होतो. खाण आणि कंपनी अंतर फारच कमी आहे, त्यामुळे जीव मुठीत धरून काम करावे लागते. त्यामुळे वन विभागाने बिबट्याचा बंदोबस्त लवकरात लवकर करावा.
-नरेंद्र रेड्डी कंपनी कामगार, विल्होळी.
-----
प्रतिक्रिया---
शासनाच्या प्राणी संरक्षण कायद्यानुसार बिबट्याची मादी व पिल्ले यांना पकडण्याचा कायदा नसून, पिंजरा लावता येत नाही; मात्र बिबट्या मादीला किंवा बछड्यांना पकडण्यास पिंजरा लावल्यास मादी हिंसक रूप धारण करू शकते. त्यामुळे आसपासच्या शेतकरी, नागरिक, कंपनी कर्मचाऱ्यांना त्रास होऊ शकतो. त्यामुळे तिला पकडता येत नाही.
- विवेक भदाणे आरएफओ, नाशिक.
(फोटो २१ बिबट्या)