अॅपल बोरच्या उत्पादनात घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2020 11:06 PM2020-01-24T23:06:35+5:302020-01-25T00:19:19+5:30
गेल्या आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने फूलकळ्या गळून पडल्याने अॅपल बोरांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने बाजारभाव तेजीत होते. मात्र काही दिवसांपासून आवक वाढल्याने अॅपल बोरांना अवघा दहा रुपये किलोचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. उत्पादनासाठी केलेला खर्चही फिटणे आवाक्याबाहेर असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
मानोरी : गेल्या आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने फूलकळ्या गळून पडल्याने अॅपल बोरांच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने बाजारभाव तेजीत होते. मात्र काही दिवसांपासून आवक वाढल्याने अॅपल बोरांना अवघा दहा रुपये किलोचा दर मिळत असल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. उत्पादनासाठी केलेला खर्चही फिटणे आवाक्याबाहेर असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.
गतवर्षी कोरडा दुष्काळ असताना शेतकरी विकास गोडगे यांनी पाण्याची कमतरता असतानादेखील पाण्याचे योग्य नियोजन करून अॅपल बोरांची बाग फुलवून मोठ्या प्रमाणात नफा मिळविला होता. हीच आशा कायम ठेवत यंदाही त्यांनी बागेचे संगोपन केले. यंदा समाधानकारक पाऊस पडल्याने त्यांची आशा वाढली हाती. वेळोवेळी औषध फवारणी करून बाग फुलविली. मात्र, आॅक्टोबर महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने बागेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाच्या माºयाने फूलपाकळ्या गळून पडले. यामुळे हातातोंडाशी आलेला घासच हिरवल्याची भावना गोडगे यांनी व्यक्त केली. अवकाळी पावसाने फुलकळ्या गळून पडल्यावर एका झाडाला असलेली बोरांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून आले आहे.
गेल्या महिन्यापासून अॅपल बोर विक्र ीसाठी बाजारात दाखल झाले आहे. सुरुवातीला ३५ ते ४० रु पये प्रतिकिलो इतका दर मिळाला. मात्र, सध्या १० रु पये प्रतिकिलो असा दर मिळत असल्याने बोर उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.