बनावट जन्म दाखला देणाऱ्याचा अर्ज अवैध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:13 AM2021-01-02T04:13:15+5:302021-01-02T04:13:15+5:30
रतिलाल पवार यांच्या नामांकन अर्जावर सोमनाथ भगवान दुकळे यांनी आक्षेप घेतला होता. याची सुनावणी शुक्रवारी तहसील कार्यालयात पार पडली. ...
रतिलाल पवार यांच्या नामांकन अर्जावर सोमनाथ भगवान दुकळे यांनी आक्षेप घेतला होता. याची सुनावणी शुक्रवारी तहसील कार्यालयात पार पडली. पवार यांनी जोडलेल्या नामनिर्देशन पत्रासोबत नववी उत्तीर्ण झाल्याचा जन्म दाखला जोडला होता; मात्र पवार हे पहिलीतच गैरहजर होते. त्यामुळे नववीत गेले कसे, असा सवाल दुकळे यांनी उपस्थित केला. पवार यांनी जोडलेला माळवाडी येथील महात्मा फुले विद्यालयातील दाखल्याची पडताळणी करण्यात आली. शाळेची दप्तर तपासणी करण्यात आली. शाळेकडे त्या नावाचा दाखला नसल्याचे उघडकीस आले; मात्र पवार यांनी बनावट दाखला करून २०१२ मध्ये ९ वी उत्तीर्ण झाल्याचा दावा केला होता. प्रशासकीय यंत्रणेने दाखला बनावट असल्याचे सांगत निवडणूक निर्णय अधिकारी नितीन बच्छाव यांनी पवार यांचा अर्ज अवैध ठरविला. झाडी ग्रामपंचायतीच्या ११ जागांसाठी ३६ नामांकन अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी ६ अर्ज अवैध ठरविण्यात आले. ३० अर्ज वैध आहेत.