महापौर, उपमहापौरांसह अर्ज दाखलपंचवटी विभागात २४ जागांसाठी ३९२ अर्ज सादर

By admin | Published: February 4, 2017 01:49 AM2017-02-04T01:49:01+5:302017-02-04T01:49:14+5:30

महापौर, उपमहापौरांसह अर्ज दाखलपंचवटी विभागात २४ जागांसाठी ३९२ अर्ज सादर

Application form along with Mayor, Deputy Mayor. Submission of 392 applications for 24 seats in the Election Department | महापौर, उपमहापौरांसह अर्ज दाखलपंचवटी विभागात २४ जागांसाठी ३९२ अर्ज सादर

महापौर, उपमहापौरांसह अर्ज दाखलपंचवटी विभागात २४ जागांसाठी ३९२ अर्ज सादर

Next

पंचवटी : महापालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी पंचवटीतील सहा प्रभागातील २४ जागांसाठी एकूण ३९२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी पंचवटीत महापौर, उपमहापौर, प्रभाग सभापती व आजी-माजी नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत.
प्रभाग क्रमांक १ मधील अ जागेसाठी १८, ब जागेसाठी ३, क जागेसाठी १८, ड जागेसाठी १८ असे ५७ अर्ज दाखल झाले. प्रभाग २ मधील अ जागेसाठी २२, ब जागेसाठी १६, क जागेसाठी ८, तर ड जागेसाठी १२ इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत.
प्रभाग ३ मध्ये अ जागेसाठी १५, ब जागेसाठी २०, क जागेसाठी ११, तर ड जागेसाठी २४ इच्छुकांनी अर्ज सादर केले आहेत. यात प्रभाग सभापती रूचि कुंभारकर, नगरसेवक सुनीता निमसे, समाधान जाधव, ज्योती गांगुर्डे, उद्धव निमसे, सुरेश खेताडे यांचा समावेश आहे, तर प्रभाग ४ अनुसूचित जाती महिला जागेतून नगरसेवक कविता कर्डक, डॉ. विशाल घोलप यांच्या मातोश्री प्रतिभा घोलप यांच्यासह सात इच्छुकांनी अर्ज सादर केले. अनुसूचित जमाती महिला गटातून सात महिलांंनी अर्ज दाखल केले. क गटातून ४, तर ड गटातून १४ इच्छुकांनी अर्ज सादर केले यात नगरसेवक रूपाली गावंड, हेमंत शेट्टी, सतनाम राजपूत, चांगदेव गुंजाळ, बाळासाहेब कर्डक, सागर लामखेडे, मुकुंद गांगुर्डे यांचा समावेश आहे. (वार्ताहर)

Web Title: Application form along with Mayor, Deputy Mayor. Submission of 392 applications for 24 seats in the Election Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.