अर्ज द्या अन् दाखला घ्या... येवला तहसील कार्यालयातून १५४0 दाखले

By admin | Published: June 24, 2014 08:36 PM2014-06-24T20:36:50+5:302014-06-25T00:16:03+5:30

अर्ज द्या अन् दाखला घ्या... येवला तहसील कार्यालयातून १५४0 दाखले

Apply and apply for the certificate ... 1540 documents from Yeola Tehsil office | अर्ज द्या अन् दाखला घ्या... येवला तहसील कार्यालयातून १५४0 दाखले

अर्ज द्या अन् दाखला घ्या... येवला तहसील कार्यालयातून १५४0 दाखले

Next


 
येवला : अर्ज द्या अन् दाखला घ्या ! या अभिनव उपक्रमाअंतर्गत, येवला तहसील कार्यालयाने सोमवारी तब्बल १५४0 दाखले तालुक्यातील नागरिकांना व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याने प्रशासनाचे एक सकारात्मक पाऊल म्हणून आज आता अन ताबडतोब हेच शब्द, तहसील आवारात दिवसभर ऐकू येत होते.
येवला व नांदगाव तालुक्यात नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी प्रातांधिकारी वासंती माळी व तहसीलदार शरद मंडलिक यांनी केली होती. २३ जून व २४ जून या दोन दिवसात येवला तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी, शैक्षणिक सोयीसाठी कागदपत्रे पदरात पाडून घेण्याची पर्वणीच ठरली.
सोमवारी सकाळी ११.३0 वाजेपासून सायंकाळी ७ पर्यंत दाखला वितरण कार्यक्रम चालू होता. विद्यार्थ्यांना संबंधित मागणीनुसारच दाखला व सोबत एक गुलाबाचे फूल देवून या कार्यक्रमाला सत्काराचेच रूप दिले. सेतू कार्यालयाचे सुनील सोनटक्के, बाबासाहेब डांगे यांचेसह १२ कर्मचाऱ्यांनी या कामे अथक परिश्रम घेतले. २३ जून रोजीचे उरलेले दाखले व २४ जून रोजीचा दैनंदिन दाखला देवघेव उपक्रमही यशस्वी करण्यासाठी सेतू कार्यालय रात्री ११ वाजेपर्यंत चालण्याचा अंदाज आहे.
प्रशंसा कुशल प्रशासनाची
तहसील कार्यालयात यापूर्वी खेटा मारून विद्यार्थी व नागरिक थकून जात असत तरीही दाखला मिळण्यासाठी अडचणी येत असत. मात्र तहसीलदार व प्रातांधिकारी यांनी दोन दिवस केवळ विद्यार्थ्यांसाठीच हा उपक्रम राबविल्याने विद्यार्थ्यांची मोठी सोय झाली व अधिकाऱ्यांना नफ्याच्या रुपात प्रशंसा देखील ऐकायला मिळाली.

Web Title: Apply and apply for the certificate ... 1540 documents from Yeola Tehsil office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.