निवृत्तीनाथ महाराज संस्थांनवर सदस्य नियुक्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 04:26 PM2020-11-24T16:26:15+5:302020-11-24T16:28:40+5:30
नाशिक- संत निवृत्तीनाथ समाधी संस्थान विस्वस्त मंडळाची मुदत गेल्या सहा महिन्यांपासून संपली असून आजपावेतो कोणतीही अधिसूचना नवीन संचालक निवडीसाठी करण्यात आलेली नाही. त्यामुळे लवकरात लवकर निवृत्तीनाथ संस्थानवर नवीन संचालक मंडळ नियुक्त करण्यात यावे ही एकमुखी मागणी महामंडलेश्वर आचार्य डॉ.रामकृष्ण महाराज लहवीतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सकल वारकऱ्यांच्या बैठकीत करण्यात आली.

या बैठकीत संत निवृत्तीनाथ महाराज देवस्थानच्या अपूर्ण अवस्थेतील मंदिराच्या बांधकामाबाबत चर्चा करण्यात आली. तसेच मंदिर संचालक निवडताना सर्वानुमते एक लवादाची नेमणूक करण्यात येणार असल्याचा ठराव यावेळी बैठकीत घेण्यात आला.लवाद नेमल्याने केवळ वारकरी लोकच संस्थानवर जातील व व्यापारी वृत्तीचा लोकांना या महान समाधी संस्थानचे दरवाजे कायमचे बंद होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.जोपर्यंत नवीन संचालक निवडत नाही तोपर्यंत कोणताही निधी मंदिर ठेकेदाराला विद्यमान संचालकानी देऊ नये असे या बैठकीत ठरवण्यात आले. येणाऱ्या नवीन संचालक मंडळात जिल्हानिहाय संचालक कमिटी तयार करण्यात येणार असल्याचा ठराव यावेळी करण्यात आला.
बैठकीस ह.भ.प.दामोदर महाराज गावले, बाळासाहेब काकड, प्रा.अमर ठोंबरे, वारकरी महामंडळाचे जिल्हाध्यक्ष
अण्णा महाराज हिसवळकर, दत्तू पाटील डुकरे, माधवदास महाराज राठी, लहानू पेखले, महंत संपत धोंगडे, पोपटराव फडोल, नितीन सातपुते, विठ्ठल शेलार, आबासाहेब मुरकुटे, प्रवीण वाघ आदी उपस्थित होते.