सटाणा पालिकेत अनुकंपावर ४३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:11 AM2021-06-26T04:11:26+5:302021-06-26T04:11:26+5:30

अद्यापही वारसाहक्क, अनुकंपा व रोजंदारी अशा २७ कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न सुरू असल्याचे नगराध्यक्ष मोरे यांनी ...

Appointment of 43 employees on compassionate basis in Satana Corporation | सटाणा पालिकेत अनुकंपावर ४३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

सटाणा पालिकेत अनुकंपावर ४३ कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Next

अद्यापही वारसाहक्क, अनुकंपा व रोजंदारी अशा २७ कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घेण्यासाठी शासनदरबारी प्रयत्न सुरू असल्याचे नगराध्यक्ष मोरे यांनी म्हटले आहे. वारसा हक्क कायद्यानुसार सटाणा पालिकेत सन २०१६ पासून आजपावेतो ३४ कर्मचाऱ्यांच्या वारसांना विविध पदांवर नियुक्ती देण्यात आली असून तब्बल १०-१२ वर्षांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या अनुकंपा तत्त्वावरील ४ कर्मचाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे. अनुकंपा प्रतीक्षा यादीतील २ कर्मचाऱ्यांना जुलै २०२१ च्या पहिल्याच आठवड्यात नियुक्ती देण्यात येणार असून यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व शासकीय प्रक्रिया पार पाडण्यात आल्याचे नगराध्यक्ष मोरे यांनी म्हटले आहे.

यावेळी उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, गटनेते राकेश खैरणार, महेश देवरे, काकाजी सोनवणे, दिनकर सोनवणे, सभापती राहुल पाटील, संगीता देवरे, शमा मन्सुुरी, सुवर्णा नंदाळे, नगरसेवक बाळू बागूल, सुनीता मोरकर, पुष्पा सूर्यवंशी, सोनाली बैताडे, निर्मला भदाणे, आशा भामरे, रूपाली सोनवणे, भारती सूर्यवंशी, सुरेखा बच्छाव, शमीम मुल्ला, डॉ. विद्या सोनवणे, मनोहर देवरे, मुख्याधिकारी हेमलता डगळे-हिले उपस्थित होते.

इन्फो

अनुशेष भरल्याने आनंदोत्सव

पालिकेत रोजंदारीवर असलेल्या १० कर्मचाऱ्यांपैकी ५ कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेण्यात आले असून उर्वरित ५ कर्मचाऱ्यांना लवकरच कायमस्वरूपी सेवेत सामावून घेतले जाणार असल्याची माहिती नगराध्यक्ष मोरे यांनी दिली आहे. पालिकेच्या इतिहासात प्रथमच कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांचा अनुशेष भरून निघाल्याने पालिका कर्मच्याऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून राज्य शासन संवर्गातील १७ अधिकाऱ्यांपैकी तब्बल १४ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

फोटो - २५ सटाणा पालिका

सटाणा पालिकेच्या रोजंदारी कामगारांना वारसाहक्क, अनुकंपा व रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार कायमस्वरूपी नियुक्तीपत्र देताना नगराध्यक्ष सुनील मोरे. समवेत उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, प्रशासन अधिकारी विजय देवरे, सामाजिक कार्यकर्ते दीपक नंदाळे.

===Photopath===

250621\25nsk_3_25062021_13.jpg

===Caption===

फोटो - २५ सटाणा पालिका सटाणा पालिकेच्या रोजदांरी कामगारांना वारसाहक्क, अनुकंपा व रोजंदारी कर्मचाऱ्यांना शासन नियमानुसार कायमस्वरूपी नियुक्ती पत्र देतांना नगराध्यक्ष सुनिल मोरे.  समवेत उपनगराध्यक्ष दीपक पाकळे, प्रशासन अधिकारी विजय देवरे, सामाजिक कार्यकर्ते दीपक नंदाळे.

Web Title: Appointment of 43 employees on compassionate basis in Satana Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.