तणावमुक्त परीक्षेसाठी राज्यस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2020 04:26 PM2020-02-08T16:26:39+5:302020-02-08T16:29:53+5:30

माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च-२०२० मध्ये घेण्यात येणारी बारावी परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० या महिनाभराच्या कालावधी  होणार आहे. या पार्श्वभूमीवर तणावमुक्त परीक्षेसाठी राज्यस्तरीय मंडळातर्फे दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून, हे समुपदेशक सकाळी ८ ते रात्री पर्यंत विद्यार्थी आणि पालकांसाठी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून उपलब्ध राहणार आहे.

Appointment of Counselors at the State Level for Stress Free Examination | तणावमुक्त परीक्षेसाठी राज्यस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती

तणावमुक्त परीक्षेसाठी राज्यस्तरावर समुपदेशकांची नियुक्ती

Next
ठळक मुद्दे १८ फेब्रुवारीपासून बारावीची परीक्षातणावमुक्त परीक्षांसाठी समुपदेशक नियुक्त

नाशिक : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च-२०२० मध्ये घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (बारावी) परीक्षा १८ फेब्रुवारी ते १८ मार्च २०२० या महिनाभराच्या कालावधी  होणार आहे. या पार्श्वभूमीवर तणावमुक्त परीक्षेसाठी राज्यस्तरीय मंडळातर्फे दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली असून, हे समुपदेशक सकाळी ८ ते रात्री पर्यंत विद्यार्थी आणि पालकांसाठी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून उपलब्ध राहणार आहे. 
 माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (दहावी)ची लेखी परीक्षा ३ ते २३ मार्च २०२० या कालावधीत नाशिकसह पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत घेतली जाणार आहे. या परीक्षेच्या काळात अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भीतीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी तसेच आॅनलाइन समुपदेशन करण्यासाठी राज्यमंडळ स्तरावरून दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित समुपदेशकांचे भ्रमणध्वनी क्रमांक प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केले आहे. हे सर्व समुपदेशक सकाळी ८ वाजेपासून ते रात्री ८ वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना निशुल्क आवश्यक ते समुपदेशन करतील. परंतु, विद्यार्थी अथवा पालकांनी परीक्षा कें द्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंदर्भातील प्रश्न समुपदेशकांना विचारू नये, असेही मंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  

Web Title: Appointment of Counselors at the State Level for Stress Free Examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.