पोलिंग एजंट्सच्या नेमणुका

By admin | Published: October 15, 2014 12:40 AM2014-10-15T00:40:26+5:302014-10-15T00:41:17+5:30

पोलिंग एजंट्सच्या नेमणुका

Appointment of polling agents | पोलिंग एजंट्सच्या नेमणुका

पोलिंग एजंट्सच्या नेमणुका

Next

नाशिक : बुधवारी (दि. १५) होणाऱ्या मतदानाच्या वेळी जागल्याची भूमिका निभावणाऱ्या पोलिंग एजंट्सच्या नेमणुका केंद्रनिहाय करत बोगस मतदान रोखण्यासाठी उमेदवारांनी त्यांना कानमंत्र दिला. दरम्यान, सर्वच पक्षांच्या प्रचार कार्यालयात संबंधित पोलिंग एजंट्सच्या नेमणुका करण्यासाठी धावपळ सुरू होती. मतदानाच्या वेळी मतदान केंद्रावर उमेदवारांचा प्रतिनिधी म्हणून पोलिंग एजंट्स महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असतात. प्रत्यक्ष मतदान केंद्रात या प्रतिनिधींची बसण्याची व्यवस्था करण्यात येत असते. मतदान केंद्रात येणाऱ्या प्रत्येक मतदाराची ओळख पटविणे, बोगस मतदान रोखणे, ईव्हीएममध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास त्यास त्वरित आक्षेप घेणे आदि कामे पोलिंग एजंट्सकडून केली जातात. एकप्रकारे पोलिंग एजंट्सने डोळ्यात तेल घालून केंद्रावर खडा पहारा ठेवायचा असतो. पोलिंग एजंट्स हे त्या-त्या भागातील नेमले जात असल्याने त्यांना कोण मतदार आपला आणि कोण विरोधी उमेदवारांचा, याची बऱ्याच प्रमाणात खात्री पटत असल्याने आपल्या उमेदवाराला किती मतदान झाले असेल, याचा अंदाजही बांधला जात असतो. त्यामुळे पोलिंग एजंट्सने ठेवलेल्या नोंदी उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जातात. बुधवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर बूथनिहाय पोलिंग एजंट्स नेमण्यासाठी, त्यांचे ओळखपत्र तयार करून घेण्यासाठी उमेदवारांकडून विशेष दक्षता घेतली जात होती. बोगस मतदान रोखण्याबाबत पोलिंग एजंट्सला कानमंत्रही दिले जात होते. यंदा सर्वच राजकीय पक्ष स्वबळावर लढत असल्याने मतदारसंघातील सर्वच मतदान केंद्रांवर बूथनिहाय पोलिंग एजंट्स नेमण्यासाठी त्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रामुख्याने अपक्ष म्हणून लढणाऱ्या उमेदवारांची मात्र मोठी पंचाईत होताना दिसत असून, त्यांना पुरेसे पोलिंग एजंट्स मिळविणे मुश्किल होऊन बसले. (प्रतिनिधी)

Web Title: Appointment of polling agents

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.