घोटी बाजारसमिती प्रशासकपदी सुदाम भोर यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:15 AM2021-02-10T04:15:21+5:302021-02-10T04:15:21+5:30
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी व अग्रणी संस्था समजल्या जाणाऱ्या घोटी बाजार समितीची मुदत संपुष्टात आल्याने ...
नाशिक : इगतपुरी तालुक्यातील सहकार क्षेत्रातील सर्वात मोठी व अग्रणी संस्था समजल्या जाणाऱ्या घोटी बाजार समितीची मुदत संपुष्टात आल्याने सहकार व पणन विभागाने बाजार समितीवर प्रशासकीय मंडळ नियुक्त केले आहे. यात जानोरी येथील प्रगतीशील शेतकरी तथा किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुदाम भोर यांची प्रशासकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
सहकार व पणन विभागाने बाजार समितीवर सहा सदस्यीय प्रशासकमंडळ नेमले असून यात मुख्य प्रशासक म्हणून जिल्हा सहकारी बँकेचे संचालक ॲड. संदीप गुळवे यांच्यासह किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सुदाम भोर, जिल्हा परिषद सदस्या अनिता बोडके, नंदलाल भागडे, तुकाराम वारघडे, नाना गोवर्धने यांची प्रशासक म्हणून निवड करण्यात आली आहे. दरम्यान, बाजार समिती प्रशासकपदी नियुक्ती झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुदाम भोर यांचा जानोरी येथे सत्कार करण्यात आला. यावेळी अरुण भोर, वैभव धांडे, धम्मेश गाडे, तुकाराम भोर आदी उपस्थित होते.
===Photopath===
090221\09nsk_4_09022021_13.jpg
===Caption===
बाजार समिती प्रशासकपदी नियुक्ती झाल्याच्या पार्श्वभमीवर सुदाम भोर यांचा सत्कार करताना वैभव धांडे, धम्मेश गाडे, तुकाराम भोर व अरुण भोर