शाळेतील नावीन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2018 12:11 AM2018-04-14T00:11:51+5:302018-04-14T00:11:51+5:30

लोकसहभागातून प्रगती साधलेल्या तालुक्यातील घोटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शैक्षणिक दर्जा, पालक आणि शिक्षकांचा सहभाग या बाबींचा विचार करून लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीने सर्व विद्यार्थ्यांना ओळखपत्र भेट दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले उपक्रम पाहून मान्यवर भारावून गेले होते.

Appreciation of School Innovation Activities | शाळेतील नावीन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक

शाळेतील नावीन्यपूर्ण उपक्रमांचे कौतुक

Next

सिन्नर : लोकसहभागातून प्रगती साधलेल्या तालुक्यातील घोटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा शैक्षणिक दर्जा, पालक आणि शिक्षकांचा सहभाग या बाबींचा विचार करून लायन्स क्लब आॅफ सिन्नर सिटीने सर्व विद्यार्थ्यांना ओळखपत्र भेट दिले. यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले उपक्रम पाहून मान्यवर भारावून गेले होते. लायन्स क्लबच्या माध्यमातून मविप्रचे तालुका संचालक तथा लायन्सचे झोनल आॅफिसर हेमंत वाजे, संजय सानप या देणगीदारांच्या सौजन्याने सर्व विद्यार्थ्यांना ओळखपत्र देण्यात आले. लायन्सचे अध्यक्ष डॉ. डी. एम. गडाख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास लायन्सचे पदाधिकारी तथा सिन्नर वाचनालयाचे अध्यक्ष कृष्णाजी भगत, शिवाजीमाळवे, डॉ. प्रशांत गाडे, सुनील माळवे, युवराज राऊत आदी मान्यवर उपस्थित होते. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांची शिकण्याची धडपड व उत्साह पाहून कौतुक वाटते. मुलांना मिळत असणाºया सुविधा व सर्व शिक्षकांचे प्रामाणिक प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन लायन्सचे अध्यक्ष डॉ. गडाख यांनी केले. यापुढे न चुकता दरवर्षी एक उपक्रम घोटेवाडी शाळेत लायन्स क्लबच्या माध्यमातून राबविणार असल्याचे आश्वासनही त्यांनी दिले. यावेळी मुख्याध्यापक संतोष झावरे, शिक्षक पोपट नागरगोजे, सोनाली शिंदे, सुरेखा शेळके आदींसह शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह बापू घोटेकर, यादव घोटेकर, नाथाभाऊ घोटेकर, भास्कर घोटेकर, लक्ष्मण घोटेकर, भीमराज कांदळकर, गोपीनाथ खामकर आदींसह ग्रामस्थ, पालक यावेळी उपस्थित होते.

Web Title: Appreciation of School Innovation Activities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Schoolशाळा