नाशिक शहरात दलित वस्तीच्या १२ कोटींच्या कामांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 02:58 PM2018-03-10T14:58:19+5:302018-03-10T14:58:19+5:30

प्रभागातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक दलित व अनुसूचित जाती, जमातीची संख्या असलेल्या भागात जनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जातो. साधारणत: या कामांमध्ये दलित वस्तीत रस्ते, गटार, पथदीप

Approval of 12 crore works of Dalit people in Nashik city | नाशिक शहरात दलित वस्तीच्या १२ कोटींच्या कामांना मंजुरी

नाशिक शहरात दलित वस्तीच्या १२ कोटींच्या कामांना मंजुरी

Next
ठळक मुद्देमहापालिका उदासीन : कामे होण्याविषयी साशंकता१२ कोटी रुपयांच्या ३५ कामांना प्रशासकीय मान्यता

नाशिक : राज्य सरकारच्या दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत नाशिक महापालिका हद्दीतील दलित वस्तीसाठी १२ कोटी रुपयांच्या ३५ कामांना प्रशासकीय मान्यता देऊन जिल्हा प्रशासनाने सदरचा निधीही वर्ग केला असला तरी, अद्याप एकाही कामाच्या निविदा न निघाल्याने या कामांविषयी साशंकता निर्माण झाली आहे.
प्रभागातील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत ५० टक्क्यांहून अधिक दलित व अनुसूचित जाती, जमातीची संख्या असलेल्या भागात जनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला जातो. साधारणत: या कामांमध्ये दलित वस्तीत रस्ते, गटार, पथदीप, समाजमंदिर, सामाजिक सुविधांची कामे केली जावीत असे अपेक्षित असून, त्या त्या भागाची निकड व नागरिकांची मागणी याचा मेळ घालून कामाचे अंदाजपत्रक तयार केले जाते. राज्य सरकारकडून महापालिका, नगरपालिका, नगरपंचायतींसाठी दरवर्षी मोठा निधी उपलब्ध करून दिला जात असताना प्रत्यक्षात, मात्र अशी कामे करण्यास संबंधित स्थानिक संस्थाच उदासीन दिसून येतात. नाशिक महापालिकेसाठी जवळपास १५ कोटी रुपयांचा निधी देण्याची तयारी शासनाची असताना प्रत्यक्षात महापालिकेने फक्त १२ कोटी ७२ लाख रुपयांचे ३५ कामांचे प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी जिल्हा प्रशासनाकडे सादर केले होते. गेल्या वर्षांपासून या संदर्भात जिल्हा प्रशासनाने महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. परंतु महापालिकेने पाठविलेले प्रस्ताव चुकीचे व त्यात तांत्रिक दोष असल्याने प्रशासनाने सदरचे प्रस्ताव दुरुस्तीसाठी पुन्हा परत पाठविले होते. आता मात्र सदरचे प्रस्ताव महापालिकेने फेर सादर केल्याने त्यांना प्रशासकीय मंजुरी गेल्या महिन्यातच देण्यात आली आहे. तथापि, महापालिका प्रशासनाने कामांची सुरुवात करण्याबाबत कोणतेही पावले उचलली नाहीत, उलटपक्षी या कामांसाठी येणाºया खर्चाचा काही वाटा उचलण्याची महापालिकेने तयारी न दर्शवितात या कामांना स्थगिती दिली आहे.

Web Title: Approval of 12 crore works of Dalit people in Nashik city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.