मुख्याध्यापक अधिवेशनात १९ मागण्यांच्या ठरावांना मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2019 12:54 AM2019-12-26T00:54:15+5:302019-12-26T00:54:39+5:30

सिन्नर : अखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे ५९ वे शैक्षणिक संमेलन वर्धा येथे पार पडले. त्यात १९ मागण्यांच्या ठरावांना मंजुरी देण्यात आली.

Approval of 19 demanding resolutions in the Headquarters Convention | मुख्याध्यापक अधिवेशनात १९ मागण्यांच्या ठरावांना मंजुरी

मुख्याध्यापक अधिवेशनात १९ मागण्यांच्या ठरावांना मंजुरी

Next
ठळक मुद्दे १९ मागण्यांचा ठरावात समावेश आहे.


सिन्नर : अखिल महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे ५९ वे शैक्षणिक संमेलन वर्धा येथे पार पडले. त्यात १९ मागण्यांच्या ठरावांना मंजुरी देण्यात आली.
२०२० मध्ये होणारे ६०वे शैक्षणिक संमेलन नाशिक विभागाचे शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्या मार्गदर्शनाने व जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांच्या सहकार्याने ओढा येथील मातोश्री इंजिनिअरिंग कॉलेज येथे घेण्यात येणार असल्याचे ठरवण्यात आले.
जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एस. के. सावंत, सचिव एस. बी. देशमुख यांच्यासह पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करून महामंडळाचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब आवारी, मारुती खेडकर, दीपक बोंदवल, नंदकुमार बारगावकर यांना पत्र देऊन तशी परवानगी घेण्यात आली. वर्धा येथील ऐतिहासिक अधिवेशनासाठी नाशिक जिल्ह्यातून २५० पेक्षा अधिक मुख्याध्यापक उपस्थित होते.
नाशिक जिल्ह्यातील गुणवंत व उपक्रमशील अशा १९ मुख्याध्यापकांचा माजी शिक्षणमंत्री वसंत पुरके यांच्या हस्ते राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.
कुलपती वेदप्रकाश मिश्रा, माजी खासदार दत्ता मेघे, खासदार रामदास तडस, आमदार विक्रम काळे, किशोर दराडे, नागो गाणार, श्रीकांत देशपांडे, विकास ठाकरे, पंकज भोयर, रणजित कांबळे, बाळाराम पाटील यांनी मुख्याध्यापकांना मार्गदर्शन केले. मंजूर केलेल्या ठरावात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध निकष समितीचा शिराफशींची अंमलबजावणी करावी, सेवकनिश्चितीचे व दुरुस्तीचे अधिकार शिक्षकांना द्यावे, सहाव्या वेतन आयोगातील वेतनश्रेणी दूर करून मुख्याध्यापकांना सातव्या वेतन आयोगात केंद्राप्रमाणे वेतनश्रेणी लागू करावी यांच्यासह १९ मागण्यांचा ठरावात समावेश आहे.

Web Title: Approval of 19 demanding resolutions in the Headquarters Convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.