अडीच कोटींच्या विकासकामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:25 AM2021-02-06T04:25:35+5:302021-02-06T04:25:35+5:30
स्थायी समिती सभापती राजाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या सभागृहात स्थायीची बैठक झाली. बैठकीत सटाणा नाका ते गिरणा नदीपात्र ...
स्थायी समिती सभापती राजाराम जाधव यांच्या अध्यक्षतेखाली मनपाच्या सभागृहात स्थायीची बैठक झाली. बैठकीत सटाणा नाका ते गिरणा नदीपात्र तसेच सोयगाव भागातील भुयारी गटारीच्या निविदांना मंजुरी देण्यात आली. ४४ लाख ६२ हजार ९४२ रुपये रकमेच्या भुयारी गटार कामाच्या निविदा होत्या. शहरातील विविध ठिकाणचे रस्ते, सिमेंट रस्ते कामाच्या निविदांनाही मंजुरी देण्यात आली. बयाणा रक्कम अदा करण्याच्या निविदांना मान्यता देण्यात आली. स्थायीच्या बैठकीत सुमारे अडीच कोटींच्या विविध विकासकामांना मंजुरी देण्यात आली. कोरोनानंतर झालेल्या बैठकीत कामांना हिरवा कंदील मिळाला आहे. बैठकीला डॉ. खालिद परवेझ, मुस्तकीम डिंगणिती, सहायक आयुक्त राजू खैरनार आदींसह सदस्य उपस्थित होते.