यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळ स्थापण्यास मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:18 AM2021-08-24T04:18:39+5:302021-08-24T04:18:39+5:30
यंत्रमाग कामगारांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा, शासकीय फायदे मिळत नसल्याने मागील १५ ते २० वर्षांपासून यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळाची ...
यंत्रमाग कामगारांना कुठल्याही प्रकारची सुरक्षा, शासकीय फायदे मिळत नसल्याने मागील १५ ते २० वर्षांपासून यंत्रमाग कामगार कल्याणकारी महामंडळाची मागणी केली जात हाेती. राज्यभरात ९ लाख ५० हजार यंत्रमाग आहेत. या व्यवसायावर ४ लाख ५० हजार कामगार अवलंबून आहेत. हे कामगार असंघटित कामगार म्हणून काम करीत आहे. या पार्श्वभूमीवर कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी वस्त्राेद्याेग विभागाचे अधिकारी, यंत्रमाग मालक व कामगार संघटना प्रतिनिधींची बैठक घेतली. या आधी नेमलेल्या तीन समित्यांचा अभिप्राय तसेच नवीन सूचनांचा विचार करून बांधकाम कामगार महामंडळाच्या धर्तीवर यंत्रमाग कामगार महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे यंत्रमाग कामगारांना माेठा दिलासा मिळणार असल्याचे आमदार मुफ्ती यांनी सांगितले. बैठकीला कृषी मंत्री दादा भुसे, आमदार प्रणिती शिंदे, आमदार अनिल बाबर, आमदार प्रकाश आवाडे, आमदार सुभाष देशमुख, माजी आमदार सुरेश हाळवणकर, नरसय्या आडम, अमित गाताडे, प्रधान सचिव विनिता वेदसिंगल, विकास आयुक्त (असंघटित कामगार) डाॅ. अश्विनी जाेशी, कामगार आयुक्त सुरेश जाधव, सतीश काेष्टी आदी उपस्थित हाेते.
फोटो- २३ मुंबई मिटिंग
मुंबई मंत्रालयात झालेल्या बैठकीत चर्चा करताना कामगार मंत्री हसन मुश्रीफ. समवेत आमदार मुफ्ती माेहंमद इस्माईल.
230821\23nsk_19_23082021_13.jpg
फोटो- २३ मुंबई मिटींग मुबंई मंत्रालयात झालेल्या बैठकीत चर्चा करताना कामगार मंत्री हसन मुश्रीफ. समवेत आमदार मुफ्ती माेहंमद इस्माईल.