केंद्राकडून मका खरेदीस मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2020 09:13 PM2020-07-23T21:13:50+5:302020-07-24T00:27:34+5:30
लासलगाव : केंद्र सरकार मार्फत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी २५ हजार मे.टन मका खरेदीस तिसऱ्यांदा क्षमता वाढवून देण्यात आली आहे. आजपर्यंत ९० हजार मे.टन मका खरेदीकरिता क्षमतेत वाढ करून देण्यात आली होती.
लासलगाव : केंद्र सरकार मार्फत महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांसाठी २५ हजार मे.टन मका खरेदीस तिसऱ्यांदा क्षमता वाढवून देण्यात आली आहे.
आजपर्यंत ९० हजार मे.टन मका खरेदीकरिता क्षमतेत वाढ करून देण्यात आली होती. त्यानुसार दिलेल्या क्षमतेची पहिल्या आणि दुसºया टप्यातील मका खरेदी पूर्ण करण्यात आली आहे. परंतु नाशिक जिल्ह्यातील बहुसंख्य शेतकर्यांकडे आज देखील चांगल्या प्रतीची मका मोठ्या प्रमाणात शिल्लक आहे. याचा विचार करता खासदार डॉ.भारती पवार यांनी केंद्राकडे पुनश्च एकदा मका खरेदी क्षमतेत वाढ करून मिळण्याची मागणी केली होती. त्यानुसार २५ हजार मे.टन मका खरेदी क्षमतेस मान्यता देण्यात आली आहे. केंद्राकडून खरेदी क्षमता वाढवून देण्यात आलेल्या निर्णयामुळे शेतकर्यांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
---------------------
शेतकरी वर्गाने पवार यांना संपर्क करून शेतकºयांकडे शिल्लक असलेली मका खरेदीसाठी अधिकची खरेदी क्षमता वाढविण्याकरिता राज्य सरकारला केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याची विनंती केली. तसेच पवार यांनी तत्काळ केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्याकडे मागणी केली असता मका खरेदीस तिसºयांदा क्षमता वाढवून देण्यात आल्याची माहिती दिली.