नांदगाव तालुक्यात रस्ते कामांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2018 03:15 PM2018-11-02T15:15:17+5:302018-11-02T15:15:24+5:30
नांदगांव: सुमारे ५.२३ कोटी रकमेचे व ११.८९ किलोमीटर लांबीचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर झाल्याच्या पत्राची प्रत ग्रामस्थांना प्राप्त झाल्याने ग्रामस्थामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
नांदगांव:
पंचक्र ोशीतील गावांना नांदगावशी जोडणारा व दळवळणाच्या दृष्टीने महत्वाचा असलेला साकोरा पांझन,जामदरी व कळमदरी या गावांना जोडणारा रस्ता व्हावा या मागणीसाठी वरील गावातील ग्रामस्थांनी केलेली आंदोलने व पाठपुरावा यांना यश येऊन सुमारे ५.२३ कोटी रकमेचे व ११.८९ किलोमीटर लांबीचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत मंजूर झाल्याच्या पत्राची प्रत ग्रामस्थांना प्राप्त झाल्याने ग्रामस्थामध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
काम पूर्ण झाल्यावर ५ वर्षे देखभाल दुरु स्तीची जबाबदारी संबंधित यंत्रणेची राहणार आहे. भौगोलिक दृष्ट्या मालेगावशी जोडणारा जवळचा मार्ग असल्याने चाकरमान्यांमध्ये समाधाना ची भावना पसरली आहे. लोकाभिमुख काम मंजूर करून लोकांची होणारी गैरसोय टाळल्याबद्दल लक्ष्मण बोरसे,देविदास पगार, अमोल पगार,संदीप पगार,नारायण पाटील,मुन्ना इनामदार,किरण गवळे,शरद सोनवणे प्रल्हाद मंडलिक व ग्रामस्थांनी सर्व अधिकारी वर्गाचे आभार मानले व कामाचा दर्जा चांगल्या प्रतीचा राहील अशी अपेक्षा व्यक्त केली.