२०० हेक्टर जमीन येणार ओलिताखाली देवनदीवरील तीन बंधाºयांच्या ४१ लाखांच्या दुरुस्ती निधीला मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:14 PM2017-12-10T23:14:13+5:302017-12-10T23:46:26+5:30
देवनदीवरील मेंढी व वडांगळी शिवारातील देवनासह अन्य दोन बंधाºयांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ४१ लाख रुपयांच्या निधीस जलसंधारण विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे.
सिन्नर : देवनदीवरील मेंढी व वडांगळी शिवारातील देवनासह अन्य दोन बंधाºयांच्या दुरुस्तीसाठी सुमारे ४१ लाख रुपयांच्या निधीस जलसंधारण विभागाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. त्यामुळे या तीन बंधाºयांच्या दुरुस्तीचा मार्ग मोकळा झाला आहे.
बंधाºयांच्या दुरुस्तीसाठी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत लघुसिंचन जलसंधारण विभाग यांच्याकडे जिल्हा परिषद सदस्य सीमंतिनी माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या मागणीनुसार या बंधाºयाच्या दुरुस्तीसाठीच्या निधीस प्रशासकीय तांत्रिक मान्यता मिळाली आहे. कासार नाल्यावरील देवनदीवरील बंधारा दुरुस्तीसाठी पाठपुरावा करण्याचे वडांगळी येथील शेतकºयांनी त्यांना साकडे घातले होते. देवना बंधाºयाची पडझड झाल्याने त्यात पाणीसाठा होत नाही. परिणामी भूजलपातळी खालावत चालली आहे. बंधाºयाची दुरुस्ती होऊन गाळ काढल्यास वडांगळीसह खडांगळी, मेंढी चोंढी शिवारातील भूजल पातळी वाढू शकेल, असे मत ग्रामस्थांनी मांडले होते. त्यानंतर कोकाटे यांनी जलसंधारणाचे अधीक्षक अभियंता मिसाळ यांची भेट घेऊन यासंदर्भात चर्चा केली होती. या बैठकीत मिसाळ यांनी या कामांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार एकलहरे येथील बंधाºयाच्या दुरुस्तीसाठी ११ लाख ७३ हजार, देवना बंधाºयाच्या दुरुस्तीसाठी २५ लाख ३३ हजार ८१६ रुपये, देवनदीवरील व कासार नाल्यावरील शिंपी मळा येथील बंधाºयाच्या दुरुस्तीसाठी ४ लाख ८० हजार रकमेची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. देवनदीवर मंजूर झालेल्या पाच कोटा बंधाºयांमुळे या परिसरातील पाण्याचा प्रश्न कायमचा मार्गी लागणार आहे. उर्वरित तीन बंधाºयांच्या निधीसाठी पालकमंत्री गिरीश महाजन, जलसंधारणमंत्री राम शिंदे यांच्याकडे मागणी केली आहे़
- सीमंतिनी कोकाटे,
जिल्हा परिषद, देवपूर गट