मलनिस्सारण प्रकल्पाच्या प्रस्तावाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:11 AM2021-06-24T04:11:50+5:302021-06-24T04:11:50+5:30

महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त भालचंद्र गोसावी, उपमहापौर नीलेश आहेर, नगरसचिव शाम बुरकुल यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. ...

Approval of sewerage project proposal | मलनिस्सारण प्रकल्पाच्या प्रस्तावाला मंजुरी

मलनिस्सारण प्रकल्पाच्या प्रस्तावाला मंजुरी

Next

महापौर ताहेरा शेख यांच्या अध्यक्षतेखाली व आयुक्त भालचंद्र गोसावी, उपमहापौर नीलेश आहेर, नगरसचिव शाम बुरकुल यांच्या उपस्थितीत बुधवारी (दि. २३) ऑनलाईन महासभा पार पडली. प्रारंभी जनता दलाचे नगरसेवक मुस्तकिम डिग्निटी व शान - ए - हिंद यांनी कॉलरा व डायरियाचे रुग्ण वाढत असल्याचे लक्ष वेधत दूषित पाणीपुरवठा केला जात असल्याची तक्रार केली. याचवेळी केंद्र शासन पुरस्कृत अमृत योजनेंतर्गत शहर मलनिस्सारण प्रकल्पाच्या प्रस्तावास मंजुरी देण्याचा विषय चर्चेला आला. यावेळी नगरसेवक सखाराम घोडके यांनी वारंवार एकाच ठेकेदाराला काम दिले जात असल्याचा आरोप केला, तर या प्रकल्पाला निधी कोण उपलब्ध करून देईल, असा प्रश्न उपस्थित केला. यावर बांधकाम विभागाचे शहर अभियंता कैलास बच्छाव यांनी प्रस्ताव पाठविल्यानंतर केंद्र शासनाकडून निधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. नगरसेवकांनी सुचविलेल्या सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत प्रस्तावित विविध कामांना महासभेने मंजुरी दिली. रमाई आवास योजना, प्रधानमंत्री घरकुल योजना, म्हाळदे घरकुल योजना व सरकारी जागेवरील घरे नियमनाकुल करण्याच्या विषयांना मार्च २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली. शहरातील ८ झोपडपट्टींचा प्रस्ताव घरे नियमनाकुल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आला असल्याचे सांगण्यात आले. महासभेच्या चर्चेत नगरसेवक मदन गायकवाड, अस्लम अन्सारी, पुष्पा गंगावणे, रशीद शेख, सखाराम घोडके, डॉ. खालीद परवेझ आदींनी भाग घेतला होता.

इन्फो

पदोन्नत्या देण्याला मंजुरी

महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या २०१२ पासून पदोन्नत्या रखडल्या होत्या. शैक्षणिक पात्रतेनुसार व ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्याच्या विषयाला मंजुरी देण्यात आली. नगरसेवक सुनील गायकवाड यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची महापालिका आरोग्य विभागाने काय तयारी केली, असा सवाल उपस्थित केला. यावर मनपा आयुक्त गोसावी यांनी कोविडच्या संभाव्य लाटेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पावसाळ्यापूर्वी चारही प्रभागनिहाय स्वच्छतेचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती उपायुक्त राजू खैरनार यांनी सभागृहाला दिली.

Web Title: Approval of sewerage project proposal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.