शिवसृष्टीसाठी अतिरिक्त जमीन हस्तांतरणास मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:15 AM2021-05-27T04:15:31+5:302021-05-27T04:15:31+5:30

येवला : शहरातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेतील ७ हजार ४८४.६० चौरस मीटर क्षेत्रफळ भूखंडापैकी ४६७४.५७ चौ.मी जागा शिवसृष्टी प्रकल्पासाठी ...

Approval for transfer of additional land for Shivsrishti | शिवसृष्टीसाठी अतिरिक्त जमीन हस्तांतरणास मान्यता

शिवसृष्टीसाठी अतिरिक्त जमीन हस्तांतरणास मान्यता

Next

येवला : शहरातील जिल्हा परिषदेच्या मालकीच्या जागेतील ७ हजार ४८४.६० चौरस मीटर क्षेत्रफळ भूखंडापैकी ४६७४.५७ चौ.मी जागा शिवसृष्टी प्रकल्पासाठी यापूर्वीच सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. मात्र, शिवसृष्टी प्रकल्पाची भव्यता, विस्तार आणि मांडणी लक्षात घेता ही जागा अपुरी पडत होती. त्यानुसार आता शिवसृष्टी व त्याअनुषंगीक कामे करण्यासाठी उर्वरित २ हजार ८१२.०३ चौरस मीटर अतिरिक्त भूखंडदेखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे.

या मान्यतेमुळे लवकरच शिवसृष्टी प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होणार आहे.

येवला शहराच्या लौकिकात व पर्यटनात भर घालण्यासाठी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवनपटावर आधारित शिवसृष्टी उभारण्याच्या प्रकल्पास, प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत सुमारे ६ कोटी निधी मंजूर आहे. या शिवसृष्टी प्रकल्पाचे भव्य-दिव्य असे स्वरूप असून यामध्ये सुशोभीकरण, आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरणविषयक अभ्यास, सुसाध्यता, संशोधनात्मक अभ्यास आदी बाबींची अभ्यास करून पूर्तता करण्यात येणार आहे. येवला शहरात उभ्या राहत असलेल्या शिवसृष्टी प्रकल्पाचा विस्तार व मांडणी पाहता सदर क्षेत्र कमी पडत होते. त्यामुळे या प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेल्या ४६७४.५७ चौ.मी क्षेत्रात अधिक वाढ करण्याबाबत भुजबळ यांचा पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार वाढीव २८१२.०३ चौ.मी भूखंड बुधवारी (दि.२६) सार्वजनिक विभागाकडे हस्तांतरित करण्यासाठी शासनाने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पासाठी अतिरिक्त भूखंड मिळाल्यामुळे आता या प्रकल्पाच्या विस्तार व मांडणीस मदत होऊन येवला शहराच्या सौंदर्यात भर पडणार आहे.

Web Title: Approval for transfer of additional land for Shivsrishti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.