दोनशे वन हक्क दाव्यांना मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2018 01:31 AM2018-03-17T01:31:35+5:302018-03-17T01:31:35+5:30
किसान सभेने गेल्या आठवड्यात मंत्रालयावर काढलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वन हक्क कायद्यान्वये दाखल असलेल्या प्रकरणांवर शुक्रवारच्या जिल्हास्तरीय बैठकीत चर्चा करून सुमारे २०० दाव्यांना मंजुरी देण्यात आली आहे.
नाशिक : किसान सभेने गेल्या आठवड्यात मंत्रालयावर काढलेल्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर वन हक्क कायद्यान्वये दाखल असलेल्या प्रकरणांवर शुक्रवारच्या जिल्हास्तरीय बैठकीत चर्चा करून सुमारे २०० दाव्यांना मंजुरी देण्यात आली आहे. अपर जिल्हाधिकारी नीलेश सागर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत वन हक्क दाव्यांच्या प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेण्यात आला. त्यात जिल्हास्तरीय समितीकडे अपिलाने १९,२०८ दावे दाखल करण्यात आले होते. त्यातील १४३ प्रकरणे मान्य करण्यात येऊन उर्वरित ११,७४२ प्रकरणे उप विभागीय अधिकाऱ्यांकडे फेरचौकशीला पाठविण्यात आले व त्यातील ९,०२५ प्रकरणांची फेरचौकशी होऊन ते पुन्हा जिल्हास्तरीय समितीकडे पाठविण्यात आले. २,७८९ प्रकरणांना मान्यता देण्यात आली. त्यामुळे आता समितीकडे ३,२६१ व उपविभागीय समितीकडे ४,३१५ दावे प्रलंबित असल्याचे सांगण्यात आले.