सोमपूर-जायखेडा बंधाऱ्याच्या बंदिस्त पाइपलाइनच्या कामाला मंजुरी

By श्याम बागुल | Published: September 27, 2018 03:20 PM2018-09-27T15:20:45+5:302018-09-27T15:22:26+5:30

येत्या दोन वर्षांत सदरचे काम पूर्ण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले असून, त्यासंदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला आह. हरणबारी धरणातून मोसम नदीत सुटणारे पाणी बागलाण तालुक्यातील सोमपूर येथे अडविण्यासाठी ब्रिटिश कालीन बंधारा आहे.

Approval for the work of Bandipur pipeline of Sompur-Jaaykheda dam | सोमपूर-जायखेडा बंधाऱ्याच्या बंदिस्त पाइपलाइनच्या कामाला मंजुरी

सोमपूर-जायखेडा बंधाऱ्याच्या बंदिस्त पाइपलाइनच्या कामाला मंजुरी

Next
ठळक मुद्देजलसंपदाचा निर्णय : ४२ लाखांच्या कामाला प्रशासकीय मान्यताजायखेडा बंधारा २००५ मध्ये आलेल्या पुरामुळे तुटला होता.

नाशिक : हरणबारी धरणातून मोसम नदीवर बांधण्यात आलेल्या सोमपूर गावाजवळील ब्रिटिश कालीन बंधारा ते जायखेडा बंधाºयापर्यंत कालव्याची झालेली दुरवस्था व वाया जाणा-या पाण्याचा विचार करता सोमपूर ते जायखेडा यादरम्यान कालव्यातून बंदिस्त पाइपलाइन टाकण्यास राज्याच्या जलसंपदा विभागाने मंजुरी दिली असून, त्यासाठी ४२ लाख रुपयांच्या कामाला प्रशासकीय मान्यताही देण्यात आली आहे.
येत्या दोन वर्षांत सदरचे काम पूर्ण करण्याचे आदेश जलसंपदा विभागाने दिले असून, त्यासंदर्भातील शासन आदेश जारी करण्यात आला आह. हरणबारी धरणातून मोसम नदीत सुटणारे पाणी बागलाण तालुक्यातील सोमपूर येथे अडविण्यासाठी ब्रिटिश कालीन बंधारा आहे. या बंधाºयापासून जायखेडा गावापर्यंत सहा किलोमीटर कालवा असून, या कालव्याच्या पाण्यावर जायखेडा शिवारातील १४० हेक्टर सिंचन क्षेत्र अवलंबून आहे. जायखेडा बंधारा २००५ मध्ये आलेल्या पुरामुळे तुटला होता. त्याचे काम पाच वर्षांनंतर पूर्ण झाले. त्यानंतर जायखेडा कालव्यातून सिंचनासाठी नियमित पाणी दिले जात असले तरी, सोमपूर गावाजवळ या कालव्याच्या उजव्या बाजूस असलेल्या उंचीमुळे पावसाळ्यात गावाचे सांडपाणी व वाहून येणारा गाळ थेट कालव्यात जमा होत असल्यामुळे कालवा गाळाने भरत आहे. त्यामुळे कालव्यातून पाणी वाहून नेण्याची क्षमता घटून पाण्याच्या वहनातही अडचणी निर्माण होत असल्याची बाब वेळोवेळी पाटबंधारे खात्याच्या निदर्शनास गावकºयांनी आणून दिली होती. त्यामुळे कालव्यातच बंदिस्त पाइपलाइन टाकून कायमस्वरूपी प्रश्न सोडविण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या कामासाठी एकूण ४२ लाख ५१ हजार ८७५ रुपये खर्च येणार असून, जलसंपदा विभागाने खर्चास मान्यता देण्याबरोबरच कामाला प्रशासकीय मंजुरीचे आदेश काढले आहेत.

Web Title: Approval for the work of Bandipur pipeline of Sompur-Jaaykheda dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.