चणकापूर उजव्या कालव्याची वहन क्षमता वाढविण्याच्या कामास मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 03:09 PM2019-08-31T15:09:04+5:302019-08-31T15:10:14+5:30
देवळा : मुंबई येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत चणकापूर उजवा कालवा किमी १ ते ३८ ची वहन क्षमता वाढवण्यासाठी चार कोटी ८२ लक्ष रु पयांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. यामुळे तालुक्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे.
देवळा : मुंबई येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत चणकापूर उजवा कालवा किमी १ ते ३८ ची वहन क्षमता वाढवण्यासाठी चार कोटी ८२ लक्ष रु पयांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. यामुळे तालुक्यातील जनतेला दिलासा मिळाला आहे. अवर्षण प्रवण असलेल्या देवळा तालुक्यासाठी चणकापूर उजवा कालवा वरदान ठरला आहे. परंतु कमी वहन क्षमतेमुळे कालव्याच्या टेलला अवघे ५० ते ६० क्युसेक्स पाणी येते. ते तालुक्यातील जनतेची पाण्याची मागणी पाहता खूपच अपूरे आहे. कालव्याची वहन क्षमता वाढवल्यानंतर चणकापूर धरणाच्या पूर पाण्याने कमी कालावधीत देवळा व मालेगाव तालुक्यातील दोन लघुपाटबंधारे, २३ तलाव व ११ केटीवेअर भरणे शक्य होणार आहे.
चणकापूर उजव्या कालव्याचे काम सन १९९५/९६ ते २००० या कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे. सन २००० पासून सदर कालवा पूर पाण्याने प्रवाहित होत आहे. तथापि बहुतांशी कालवा डोंगरा लगत असल्याने व सतत वापरामुळे सद्यस्थितीत कालव्यावरील भरावाची माथा पातळी संकिल्पत माथा पातळीपेक्षा कमी झाली आहे. चणकापूर उजवा कालवा व त्यापुढील वाढीव कालव्याद्वारे चणकापूर धरणाच्या सांडव्यावरून वाहणार्या पावसाळ्यातील पूर पाण्याने देवळा व मालेगाव या दुष्काळी तालुक्यातील विविध तलाव हे सांडव्यावरून वाहणाऱ्या पूर पाण्याचा कालावधी कमी झाल्याने पूर्ण क्षमतेने भरण्यास अडचण येते. त्यामुळे या कायम दुष्काळी भागास सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी पाणी उपलब्ध होऊ शकेल या उद्देशाने कालव्याची वहन क्षमता वाढवावी, कमी कालावधीत लाभक्षेत्रातील तलाव व जलस्त्रोत भरणे शक्य होईल अशी येथील जनतेची मागणी होती. लवकरच कालवा विस्तारीकरणाच्या कामास गती मिळणार आहे.