‘स्वीकृत’ची हंडी फुटली! नऊ महिन्यांनंतर मुहूर्त : भाजपाचे तीन, सेनेचे दोन सदस्य नियुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2017 12:10 AM2017-11-21T00:10:29+5:302017-11-21T00:11:43+5:30
नाशिक : गेल्या नऊ महिन्यांपासून महापालिकेत नियुक्त करावयाच्या स्वीकृत सदस्यत्वाची हंडी अखेर सोमवारी (दि. २०) फुटली. महापौर रंजना भानसी यांनी महासभेत भाजपाचे तीन, तर शिवसेनेच्या दोन सदस्यांची स्वीकृत नगरसेवक म्हणून घोषणा केली. शिवसेनेने दीड महिन्यांपूर्वीच आपल्या सदस्यांची नावे नगरसचिव विभागाकडे दिलेली होती, तर भाजपात मात्र सदस्यांच्या नावावर एकमत होत नव्हते. त्यामुळे नियुक्ती प्रक्रिया रखडली होती. अखेर नऊ महिन्यांनंतर स्वीकृतच्या नियुक्तीला मुहूर्त लागला.

महासभेत महापौर रंजना भानसी यांनी भाजपाचे शहर सरचिटणीस प्रशांत गोरख जाधव, भाजयुमोचे शहराध्यक्ष अजिंक्य विजय साने आणि नाशिकरोड भाजपा मंडलाचे अध्यक्ष बाजीराव लहानू भागवत, तर शिवसेनेचे कार्यालयीन कर्मचारी सुनील गोडसे आणि महिला भाजपाच्या इच्छुक असलेल्या ज्येष्ठ कार्यकर्त्या सुजाता करजगीकर यांनी घराणेशाहीचा आरोप करत शहराध्यक्षांवरही टीकास्त्र सोडले. गेल्या ३० वर्षांपासून आपण निष्ठेने पक्षाचे काम करत आलो आहे; परंतु घराणेशाहीच चालणार असेल तर आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी हमाल्याच करायच्या का? शहराध्यक्षांनी आपला मतदारसंघ टिकवण्यासाठी जवळच्या लोकांना सोयीची पदे दिली. आता शिक्षण मंडळाचे गाजर दाखविले जात आहे. महिला कार्यकर्त्यांत नाराजी स्वीकृत सदस्यत्वासाठी शिवसेनेने महिला कार्यकर्त्याला संधी दिली असताना भाजपातही एका महिलेला प्रतिनिधित्व दिले जाईल, अशी अटकळ बांधली जात होती. त्यामुळे भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्या आणि पक्षाच्या प्रत्येक आंदोलनात सक्रिय असणाºया सुजाता करजगीकर व भारती बागुल यांच्या नावांची चर्चा होत होती. परंतु, भाजपाने महिलांना संधी न दिल्याने इच्छुक महिला कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. दीर्घकाळ पक्षात राहूनही न्याय न मिळाल्याने नाराजीची भावना इच्छुक महिलांनी बोलून दाखवली, तर काही इच्छुकांनी अजूनही आपल्याला पक्षाकडून न्यायाची अपेक्षा असल्याचे सांगितले.