मंजूर झालेली घरे दोन वर्षांनंतरही अपूर्णावस्थेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 11:11 PM2021-09-07T23:11:11+5:302021-09-07T23:11:43+5:30
नांदगाव : प्रधानमंत्री आवास योजनेत नांदगाव तालुका पंचायत समितीने अग्रक्रम मिळविला तर दुसरीकडे याच प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी नगर परिषद प्रशासनाकडे जोडे झिजवत असल्याचे चित्र आहे.
नांदगाव : प्रधानमंत्री आवास योजनेत नांदगाव तालुका पंचायत समितीने अग्रक्रम मिळविला तर दुसरीकडे याच प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थी नगर परिषद प्रशासनाकडे जोडे झिजवत असल्याचे चित्र आहे.
मंजूर झालेली घरे दोन वर्षांनंतरदेखील अपूर्ण अवस्थेत आहेत. घरकूल लाभार्थींना निधी मिळत नसल्याची तक्रार आहे. नांदगाव शहरात ५० घरकुले दोन वर्षांपासून मंजूर आहेत. यातील दोन हप्ते मिळाले आहेत. परंतु घरकुलांचे काम दोन वर्षांपासून रेंगाळले आहे.
याबाबत प्रशासन उदासीन आहे, असे लाभार्थींचे म्हणणे आहे. योजनेतून लाभार्थींना दोन लाख साठ हजार रुपयांना मंजुरी मिळाली आहे. मात्र दोन हप्ते म्हणजे ४० हजार रु. मिळाले आहेत. पुढील निधी न मिळाल्याने घरकूलधारक त्रस्त झाले आहेत. आपली घरांची स्वप्ने पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनाने पावले उचलावीत अन्यथा आंदोलनाचा इशारा आवास योजनेच्या विस्थापित घरकूलधारकांनी पालिका प्रशासनाला दिला आहे.
मुक्ताबाई आहिरे, संजय देवकते, जिजाबाई गांगुर्डे, आशाबाई कन्नोर, मीनाबाई पाटील, सुमनबाई काळे, संतोष दरगुडे, बंडू म्हस्के, मीरा शेळके, शरीफ शेख, शोभा कबीर, मच्छिंद्र काकळीज आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.