कर्जमाफीसाठी सुमारे दोन लाख शेतकºयांचे अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 11:56 PM2017-09-04T23:56:11+5:302017-09-05T00:06:42+5:30

सहभागी होण्याचे आवाहन : पीककर्ज अवघे ३० टक्के लोकमत न्यूज नेटवर्क नाशिक : कर्जबाजारी शेतकºयांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली छत्रपती स्वाभिमान योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ९० हजार शेतकºयांनी आजवर अर्ज दाखल केले असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी अवघे दहा दिवस शिल्लक असून, शेतकºयांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी केले आहे.

 Approximately two lakh farmers' application for loan waiver | कर्जमाफीसाठी सुमारे दोन लाख शेतकºयांचे अर्ज

कर्जमाफीसाठी सुमारे दोन लाख शेतकºयांचे अर्ज

Next

सहभागी होण्याचे आवाहन : पीककर्ज अवघे ३० टक्के लोकमत न्यूज नेटवर्क
नाशिक : कर्जबाजारी शेतकºयांसाठी राज्य सरकारने जाहीर केलेली छत्रपती स्वाभिमान योजनेंतर्गत जिल्ह्यातील एक लाख ९० हजार शेतकºयांनी आजवर अर्ज दाखल केले असून, या योजनेत सहभागी होण्यासाठी अवघे दहा दिवस शिल्लक असून, शेतकºयांनी लवकरात लवकर आपले अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी बालसुब्रह्मण्यम राधाकृष्णन् यांनी केले आहे.
राज्य सरकारने या योजनेसाठी १५ सप्टेंबरपर्यंत शेतकºयांना अर्ज सादर करण्याची मुदत दिली असली तरी, बºयाच ठिकाणी सर्व्हर डाउनच्या तक्रारी येत असल्याने अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याच्या तक्रारी आहेत. त्यामुळे शेतकºयांनी पाठ फिरविल्याचे बोलले जाते. परंतु शासनाने त्यावर पर्याय म्हणून आॅफलाइन अर्ज घेण्याची मुभा दिली आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्णात १ लाख ९० हजार शेतकºयांनी आजवर अर्ज भरून दिले असले तरी, जिल्हाधिकाºयांच्या मते ही संख्या अन्य जिल्ह्णाच्या तुलनेत कमी आहे. शासनाने दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतल्याने त्या निकषात दीड लाख शेतकरी कर्जमाफीस पात्र ठरतील, परंतु शासनाच्या अन्य निकषांचा विचार करता अधिकाधिक शेतकºयांनी या योजनेत पात्र होण्यासाठी अर्ज करणे क्रमप्राप्त आहे. या सर्व अर्जांची नंतर छाननी करण्यात येणार असून, त्यानंतर खरे पात्र लाभार्थी निश्चित होणार असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.
जिल्ह्णातील शेतकºयांना आजवर फक्त ३० टक्केच खरीप पीक वाटप करण्यात आले असून, ते वाढविण्यासाठी बॅँकांना सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कर्जमाफीचे अर्ज भरून देण्यासाठी १० दिवसांचा कालावधी असून, शेतकºयांनी शेवटच्या दिवसाची वाट न पहाता आत्तापासूनच अर्ज भरण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Web Title:  Approximately two lakh farmers' application for loan waiver

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.