एप्रिल वाढविणार जिल्ह्याचा ‘ताप’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:14 AM2021-04-04T04:14:45+5:302021-04-04T04:14:45+5:30
---- लोकमत न्युज नेटवर्क -------- नाशिक : शहर व परिसरात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उन्हाळा अधिकाधिक तीव्र राहणार ...
----
लोकमत न्युज नेटवर्क
--------
नाशिक : शहर व परिसरात मागील वर्षाच्या तुलनेत यंदा उन्हाळा अधिकाधिक तीव्र राहणार असल्याचे संकेत मार्चमध्येच निसर्गाने दिले आहे. एप्रिलमध्ये जिल्ह्याचा ''ताप'' अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. यावर्षी २८ मार्च रोजी ३९.१ अंशांपर्यंत तापमान पोहचले होते. या महिन्यात तापमानाचा पारा चाळिशीचा टप्पा ओलांडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविली जात आहे.
गेल्या वर्षी मार्च महिन्यात ३६.८ अंश इतके उच्चांकी कमाल तापमान नोंदविले गेले होते. यावर्षी मात्र हा रेकॉर्ड ब्रेक झाला असून रविवारी (दि. २८), तर कमाल तापमानाचा पारा थेट ३९.१ अंशांपर्यंत पोहोचल्याची नोंद पेठरोडवरील हवामान निरीक्षण केंद्राकडून करण्यात आली होती. मागील चार दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा काही अंशाने घसरला असला तरी ३६ अंशांच्या जवळपास पारा स्थिरावत आहे. यासह किमान तापमानातही वाढ होऊ लागल्याने नाशिककरांना रात्रीही उकड्याचा सामना करावा लागत आहे.
मार्चअखेर उन्हाच्या तीव्रतेत झालेली वाढ एप्रिलमध्येही कायम राहणार आहे किंबहुना काही अंशी अधिक वाढणार असल्याचेही संकेत आहे. नाशिकमध्ये दरवर्षी एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून ऊन तापण्यास सुरुवात होते. सोमवारपासून वाऱ्याचा वेग अजून काहीसा मंदावला जाणार असल्याने उन्हाच्या झळा अधिक तीव्रतेने जाणवू लागतील.
-------इन्फो---
गेल्या रविवारी तापमानाचा उच्चांक
मागील आठवड्यात शहरात अवकाळी पावसाचे ढग दाटून येत होते तसेच हलक्या सरीही पहाटे व संध्याकाळी कोसळल्या होत्या. यानंतर शनिवारी (दि.२७) शहरात ३८.२ अंश इतके तर रविवारी (दि. 28) ३९.१ अंश कमाल तापमान नोंदविले गेले होते. दिवसभर प्रखर ऊन पडल्यामुळे नागिरकांना झळा असह्य झाल्या होत्या. दुपारपासून संध्याकाळी उशिरापर्यंत शहरांमधील रस्ते सामसूम दिसून आले.
-------इन्फो-------
...असा राहील आठवडा
या आठवड्यात सध्या वाऱ्याचा वेग बऱ्यापैकी टिकून असलेला शहर व परिसरात पहावयास मिळत आहे. यामुळे उन्हाची तीव्रता वाटत नाही, परंतु पुढील आठवड्यात वातावरणाची स्थिती बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. कमाल तापमानाचा पारा अधिक वाढणार असून, रात्रीही नागरिकांना उकाडा जाणवू शकतो. एकूणच एप्रिलमध्ये शहरात उष्मा अधिक वाढण्याची चिन्हे आहेत. यामुळे उष्माघाताचा धोकाही ओढावू शकतो.
----
विशेष सूचना
(डमी आहे)
डमी फॉरमॅट R वर 01एप्रिलहिट नावाने सेव्ह आहे