वाळू उपशामुळे आरम नदी पुलास धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2018 10:58 PM2018-01-28T22:58:34+5:302018-01-29T00:10:04+5:30

सटाणा-मळगाव दरम्यान आरम नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या बैलगाडी आणि गाढवांवरून वाळू उपसा होत असल्याने तालुक्यातील पश्चिम भागाला जोडणाºया मळगाव पुलास आणि सटाणा पाटस्थळाच्या वळण बंधाºयास मोठा धोका निर्माण झाला आहे. या गंभीर घटनेकडे महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.

Aram river bridge threat due to sand rains | वाळू उपशामुळे आरम नदी पुलास धोका

वाळू उपशामुळे आरम नदी पुलास धोका

Next

दीपक सूर्यवंशी।
मुंजवाड : सटाणा-मळगाव दरम्यान आरम नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या बैलगाडी आणि गाढवांवरून वाळू उपसा होत असल्याने तालुक्यातील पश्चिम भागाला जोडणाºया मळगाव पुलास आणि सटाणा पाटस्थळाच्या वळण बंधाºयास मोठा धोका निर्माण
झाला आहे. या गंभीर घटनेकडे महसूल विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.  बागलाण तालुक्यातील पश्चिम भागातील पंचवीस ते तीस गावांना जोडणाºया  सटाणा-मळगाव पुलाजवळ मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळू  उपसा झाल्याने या ठिकाणी मोठे खड्डे तयार झाले आहेत.  यापूर्वी अशा खड्ड्यांमध्ये पडून मळगावच्या दोन मुलांना जीव गमवावा लागला आहे. आता तर या ठिकाणी असलेल्या पुलास आणि वळण बंधाºयास मोठा धोका निर्माण झाला आहे. भविष्यात आरम नदीस पावसाळ्यात मोठा पूर आल्यास बंधारा फुटण्याची भीती निर्माण झाली आहे.  बंधारा तुटल्यास त्याला लागून असलेल्या पुलास धोका निर्माण होऊ शकतो. या पुलाच्या परिसरात नदीपात्र चार ते पाच फूट खोल  झाले आहे. या ठिकाणी असलेल्या पुलास आणि वळण बंधाºयास भक्कम पाया नसल्याने सीमेंट टाकून पाया तयार केला आहे. जर या ठिकाणी असाच वाळू उपसा सुरू राहिला तर भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. नदीपात्रातील पूल किंवा बंधाºयापासून तीनशे मीटर अंतरापर्यंत वाळू उपसा करण्यास बंदी असतानाही या ठिकाणी राजरोस वाळू उपसा होत आहे.

Web Title: Aram river bridge threat due to sand rains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :riverनदी