''अरंगेत्रम'' पैंजनांच्या झनकाराने जिंकली नाशिककरांची मने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 04:52 PM2018-04-15T16:52:52+5:302018-04-15T16:52:52+5:30
घुंगरूं शिवाय नृत्यकलेचे ग्रहण केल्यानंतर कनकलता नृत्यालयाच्या शिष्यांच्या प्रथमच घुंगरुंसह भरतनाटय़म नृत्यकलाविष्कार सादरीकरणाने ह्यअंगत्रेमह्णमध्ये पैजनांचा झनकार घुमला. कनकलता प्रतिष्ठानतर्फे रविवारी भरत नाटय़मची पदवीप्राप्त शिष्या निधी ठाकर, साक्षी कदम व निराली शाह यांनी ह्यअरंगेत्रमह्णच्या माध्यमातून प्रथमच पैंजनांसग नृत्याकलाविष्कार सादर करून व्यावसायिक नृत्याविष्कार सादरीकरणाची मान्यता मिळवली.
नाशिक : घुंगरूं शिवाय नृत्यकलेचे ग्रहण केल्यानंतर कनकलता नृत्यालयाच्या शिष्यांच्या प्रथमच घुंगरुंसह भरतनाटय़म नृत्यकलाविष्कार सादरीकरणाने ह्यअंगत्रेमह्णमध्ये पैजनांचा झनकार घुमला. कनकलता प्रतिष्ठानतर्फे रविवारी भरत नाटय़मची पदवीप्राप्त शिष्या निधी ठाकर, साक्षी कदम व निराली शाह यांनी ह्यअरंगेत्रमह्णच्या माध्यमातून प्रथमच पैंजनांसग नृत्याकलाविष्कार सादर करून व्यावसायिक नृत्याविष्कार सादरीकरणाची मान्यता मिळवली. अंरगेत्रम सोहळयाच्या माध्यमातून गुरूस विद्यार्थ्यांविषयी पुरेशी तयारी झालेली असल्याची खात्री झाल्यानंतर गुरू विद्यार्थ्याकडून सलंगाई पूजा करवून घेतात व त्यावेळी घुंगरू प्रदान केले जातात. अधिक खडतर शिक्षणानंतर विद्याथ्र्याने एकट्याने किंवा एकटीने संपूर्ण कार्यक्र म करण्यासाठी अरंगेत्रम म्हणजेच पदापर्ण सोहळा आयोजित करण्यात येतो. अशाच कार्यक्रमाचे आयोजन करून कनकलता साकुरीकर यांनी त्यांच्या तिन्ही शिष्यांना अन्य कार्यक्र मांतून नृत्य करण्यास परवानगी दिली. यावेळी नृत्यालयच्या विद्याथिर्नींनी हंसनादम रातील आदि तालासह पुष्पांजली, वंसत रागातील रु पकम तालात जतीस्वरम राग मलिकाच्या मिश्रच्चपू तालात शब्दम, तोडी रागात आदि तालात वर्णम नृत्याविष्कार सादर केले. तर उत्तरार्धात भजनी ठेका ताल मिश्र मारवा रागात अभंगा व मिश्रचप्पू ताल व बिहाग रागात तिल्लना नृत्याविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी नृत्यगुरू कनकलता साकुरीकर यांच्यासह बडोद्याचे नटराजन, मुंबईचे विष्णुदास एस. रघुवेंद्र बालिगा, डॉ. राकेश मैसुरी, नकुल दायमा व श्रीलेश यांनी संगीत साथ केली.
काय आहे अरंगेत्रम
भरतनाट्यम विद्यार्थी सुरुवातीस घुंगरूंशिवाय नाचणे शिकतात. ज्यावेळी गुरूस वाटते की विद्यार्थ्याची पुरेशी तयारी झालेली आहे तेव्हा गुरू विद्यार्थ्याकडून सलंगाई पूजा करवून घेतात व त्यावेळी घुंगरू प्रदान केले जातात. अधिक खडतर शिक्षणानंतर विद्यार्थ्याने एकट्याने किंवा एकटीने संपूर्ण कार्यक्रम करणे अपेक्षित असते. याला अरंगेत्रम असे नाव आहे. अरंगेत्रम नंतर गुरू आपल्या शिष्यास इतर कार्यक्रमांतून नृत्य करण्यास परवानगी देतात.